आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्‍याकांड: दशरथनेच केले पाचही जणांवर वार, मुख्य सूत्रधार असल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - साक्री तालुक्यातील राईनपाडा हत्याकांडातील मारेकऱ्यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. गेल्या तीन दिवसांत महारू पवार व हिरालाल गवळी यांच्यासह अनेकांना अटक झाली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार, चिथावणीखोर असलेला दशरथ पवार-भील हा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानेच मृतांवर घणाघाती वार केले. बाजारपेठेपासून त्याने पीडितांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय जमावाला त्यानेच चिथावणी दिली. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये पांढरा शर्ट परिधान केलेला दशरथ दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस त्याच्या मागावर आहेत.      


राईनपाडा सामूहिक हत्याकांड प्रकरणाच्या तपसासाठी पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले आहेत. तपास कार्यात एलसीबीची मदत घेतली जात आहे. तपासात आता दशरथ पवार-भील नामक संशयिताचे नाव समोर आले आहे. बाजारपेठेपासून ग्रामपंचायतीपर्यंत मृत व्यक्तींना मारहाण करण्यासह जमावाला चिथावणी देण्यात तो पुढे असल्याचा पोलिसांचा संशय  आहे. एवढेच नव्हे तर पीडित पाचही जणांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्यावर क्रूरपणे दशरथ वार करत होता. त्याची ही क्रूरता व्हायरल झालेल्या क्लिपिंगने टिपली आहे. 

 

या क्लिपिंगमध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करून घणाघाती वार करणारा अन्य कोणी नसून दशरथ असल्याची माहिती पोलिसांनी तपासातून पुढे आली आहे. राईनपाडापासून जवळ असलेल्या सातरपाडा या गावातील तो रहिवासी आहे. शिवाय वार्साजवळ असलेल्या कळंबा गावात त्याची सासरवाडी आहे. घटनेच्या दिवशी तो राईनपाडा येथील बाजारपेठेत आला होता. नागरिकांनी मृत पाच जणांवर संशय घेतल्यावर त्यांच्यावर हात उचलण्यातही दशरथ पुढे होता. शिवाय बाजारपेठेत नागरिकांचे डोके भडकवण्याचे काम दशरथने केले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्याने पीडितांवर ते ठार होईपर्यंत वार केले असे तपासातून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आता दशरथच्या मागावर आहेत.   

 
पोलिस कोठडीत वाढ     
अटकेत असलेल्या संशयितांच्या पोलिस काेठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य �"ळखून अटकेतील संशयितांची सोमवार (दि. ९) पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  अद्याप फरार असलेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथक गुजरातमध्येही गेेले आहे.     

 

टोपीधारक दोघांकडून हिंसा     
अटकेतील संशयितांकडे पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये गांधी टोपी परिधान केलेले दोन वृद्ध दिसत असून त्यांचाही शोध सुरू आहे; परंतु त्यांची नावे पुढे आलेली नाहीत. दोघे वृद्ध पीडितांना ठार होईपर्यंत मारत सुटले होते. याशिवाय लांब केस असलेल्या एकाबद्दल विचारणा केली जाते आहे.

 

बातम्या आणखी आहेत...