आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्याकांड: 2 प्रमुख संशयितांना अटक, शेतात पाठलाग करून पोलिसांनी अावळल्या मुसक्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांना पाहताच हिरालाल आत्माराम गवळी याने शेतातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाेलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या अावळल्याच. - Divya Marathi
पोलिसांना पाहताच हिरालाल आत्माराम गवळी याने शेतातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाेलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या अावळल्याच.

धुळे- साक्री तालुक्यातील राईनपाडा शिवारात घडलेल्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी धुळे एलसीबी पथकाने गुरुवारी  हिरालाल उर्फ ढवळू  गवळी या प्रमुख संशयिताला अटक केली. साध्या वेशातील पोलिसांना पाहून हिरालाल याने शेतातून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पाेलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या अावळल्याच. बुधवारी रात्री महारू पवार या अाणखी एका संशयितालाही अटक करण्यात अाली हाेती. पाच जणांचे हत्याकांड घडवण्यात हेच दाेघे प्रमुख सूत्रधार असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या अाता २५ झाली.  


रविवारी राईनपाडा गावात सामूहिक हत्याकांड घडले होते. या घटनेनंतर बहुतांश ग्रामस्थ व संशयित अटकेच्या भीतीने फरार झाले अाहेत. काहींनी गुजरात राज्यात, तर काही जणांनी नंदुरबार जिल्हयात अाश्रय घेतला. संशयित हिरालाल उर्फ ढवळू आत्माराम गवळी (वय २२, सातरपाडा) हा खांडबारा तालुक्यातील वाटवी या गावात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी त्याला अटक करण्यात अाली. तर बुधवारी रात्री कोकणीपाडा येथून महारू पवारलाही अटक केली हाेती. गुरुवारी न्यायालयाने दाेघांना पाेलिस काेठडी सुनावली.  


पाेलिसांची माणुसकी; ज्येष्ठांना पुरवले अन्न- अाैषधी
महारू पवार हा कोकणीपाडा येथे  नातलगांकडे जाऊन लपला होता. या काळात ताे टीव्हीवरील बातम्या पाहून अपडेट घेत हाेता. दरम्यान, या हत्याकांडानंतर बहुतांश लाेकांनी गावातून पळ काढला, तर त्यांच्या घरात वृद्ध लाेक मात्र अंथरुणाला खिळून अाहेत. रविवारपासून त्यांची उपासमार हाेत अाहे. अशा १० ज्येष्ठांना पाेलिसांनी गुरुवारी अन्नाचे वाटप केले. डाॅक्टरांकडून त्यांची तपासणीही करून घेतली. 


मृतांच्या वारसांना १० लाख मदतीचा प्रस्ताव
सोलापूर- राईनपाडा येथे जमावाने केलेल्या मारहाणीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील चार जणांचा, तर कर्नाटकातील इंडी येथील एकाचा मृत्यू झाला हाेता. यापैकी महाराष्ट्रातील चाैघांच्या वारसांना १० लाखांची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात अाल्याची माहिती साेलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.  खवे येथील दादाराव शंकर भोसले, भारत शंकर भोसले, भारत शंकर माळवे, मानेवाडी येथील अगून श्रीमंत हिंगोले या चाैघांचा मृतांत समावेश अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, दुस-या प्रमुख संशयिताचा फोटो... 

बातम्या आणखी आहेत...