आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरून अल्पवयीन मुलीशी केली मैत्री; अश्लील फोटो व्हायरल करून केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- फेसबुकवरून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. काही दिवसातच तिचे अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत पहिल्याच भेटीत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना डिसेंबरला घडली होती. या प्रकरणातील संशयित तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून अटक केली. 


संजय विष्णू गुट्टे (वय २३, रा.सौराज्यनगर, बीड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने जळगावातील अल्पवयीन मुलीस टाकरखेडा परिसरात घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला हाेता. पुणे येथे बीसीएसचे शिक्षण घेतलेला संजय हा मोबाइलचे अॅप वापरण्यात तरबेज अाहे. बीड येथे एका कंपनीत तो वरिष्ठपदावर नोकरीस आहे. ताे जळगावात सन २०१४-१५ मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आला हाेता. अभ्यासाच्या निमित्ताने त्याने पीडित मुलीच्या वडीलांचा मोबाइल क्रमांक मिळवला होता. त्या मोबाइलवर फोन करून नंतर त्याने मुलीचा मोबाइल क्रमांक मिळवला. सोशल मीडियाचा गैरवापर करून त्याने मुलीचे अश्लील फोटो तयार करून तिला पाठवले होते. फोटो डिलीट करण्यासाठी भेटण्याची अट घालून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, सहाय्यक निरीक्षक आर.एन. होळकर, शशिकांत पाटील, विजय पाटील, चंद्रकांतपाटील, संजय पाटील, नरेंद्र वारुळे, रामचंद्र बोरसे इद्रिस पठाण यांच्या पथकाने संजय गुट्टेचा शोध घेत सोमवारी त्याला बीड येथून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


आणखी काही मुलींशी गैरप्रकार 
संजयगुट्टे हा उच्चशिक्षित असून त्याला अाधुनिक तंत्रज्ञानाची चांगलीच माहिती आहे. त्याचा गैरवापर करून तो मुलींच्या संपर्कात येत असतो. त्याने जळगावात असतानादेखील काही मुलींना अशाच प्रकारे फसवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...