आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन केले अत्याचार, पीडितेने दिला मुलाला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तालुक्यातील करंज येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली होती. या मुलीने ३० एप्रिल रोजी मुलास जन्म दिला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करणारा मुकेश ज्ञानेश्वर सपकाळे (वय २०, रा.करंज, ता.जळगाव) याच्या विरुद्ध पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 


त्यानुसार तालुका पोलिसांनी गुरूवारी रात्रीच मुकेश याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास ७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुकेश याने गेल्या वर्षी या पीडित मुलीवर शेतात अत्याचार केले होते. यातून ती गर्भवती झाली होती. पुण्यात तीने मुलास जन्म दिला. कुमारी माता झाल्यानंतर तिच्या वडीलांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...