आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात अडीच हजार विद्यार्थ्यांनी दिला राष्ट्रशक्तीचा नारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनानिमित्त सोमवारी काढलेल्या शाेभायात्रेत राज्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी छात्र शक्ती, राष्ट्रशक्तीच्या घाेषणांचा नारा देत जळगाव शहर दणाणून साेडले. ही शाेभायात्रा २ किलाेमीटरपर्यंत लांब होती. पुणे, उत्तर पुणे, नाशिक, नाशिक रोड, मालेगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, अंबाजोगाई, देवगिरी प्रांत, जालना, धाराशिव, नांदेड, किनवट, उद््गीर, पंढरपूर, परभणी, सोलापूर,कराड, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, साक्री  अशा जिल्हा व परिसरातील विद्यार्थी स्वतंत्र गटाने सहभागी झाले होते. आपल्या जिल्ह्यानुसार त्यांनी वेशभूषा केली होती. नांदेडचे विद्यार्थी सरदारजीच्या पगडीमध्ये, कोल्हापूरचा फेटा व विद्यार्थिनी नऊवारी साडीत, तर गांधी टोपी अशा विविध वेशभूषेत होते. पंढरपुरातील विद्यार्थ्यांनी लावलेला तेथील टिळा लक्ष वेधून घेत होता.

बातम्या आणखी आहेत...