आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबारमध्ये २ गटात दंगल; जाळपोळ, दगडफेक; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- जुन्या वादातून शहरातील कसाई मोहल्ला परिसरात २ गटात रविवारी रात्री अाठच्या सुमारास हाणामारी झाली. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करत एक वाहन जाळून टाकले, तीन वाहनांच्या काचाही फाेडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर जमाव पांगला. शहराच्या एकाच भागात दंगल झाली. उर्वरित शहरात मात्र व्यवहार सुरळीत होते. दंगलीमागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. 


शहराच्या एका भागात दंगल सुरू असल्याची खबर पोलिसांना कळवली. त्यानंतर पंधरा मिनिटात जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग,शहर पोलिस ,उपनगर पोलिस दाखल झाले, तोपर्यंत दोन्ही गट भिडले होते. विटा व दगडांचा मारा सुरूच होता. एका गटाने चारचाकी वाहन पेटवून दिले.तसेच अन्य तीन वाहनांच्या काचा फोडल्या. तीन ते चार मोटारसायकलही फोडण्यात आल्या. काही वेळातच दंगल नियंत्रण पथकासह सर्वच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री ८.३० वाजेनंतर या भागात अघोषित संचारबंदीचे वातावरण हाेते. रात्री उशिरा दंगल आटोक्यात आल्यानंतर कसाई मोहल्ला परिसरात तणावपूर्ण शांतता हाेती. विशिष्ट भागात झालेल्या दंगलीचे लोण इतरत्र पोहचू नये,यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दंगल नियंत्रणासाठी अश्रुधुराच्या तीन नळकांड्या फोडण्यात आल्या. शहराच्या इतर भागात मात्र पूर्णपणे शांतता असून व्यवहार सुरळीत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो....

बातम्या आणखी आहेत...