आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोऱ्याजवळ दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा; तीन लाखांच्या रोकडसह दागिने लुटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- माहेजी (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकापासून एक कि.मी. अंतरावरील ग्रीन सिग्नलचे लॉक तोडून चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री तीन -साडेतीन वाजेदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा टाकला. या घटनेत चोरट्यांनी एस-४ या बोगीत झोपलेल्या दोन प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, तर इतर प्रवाशांचे महागडे मोबाइल, लॅपटॉपसह एकाची तीन लाख रुपयांची रोकड व इतर वस्तू लुटून पोबारा केला. 


गुरुवारी दुरांतो एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जात होती. मात्र, ही रेल्वे माहेजी स्थानकापासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर असतानाच एका पोलाचा होम सिग्नलचा लॉक चोरट्यांनी तोडला होता. त्यामुळे रेल्वेला सिग्नल न मिळाल्याने ती तेथेच थांबली. याबाबत रेल्वेच्या लोको पायलटांनी माहिजी रेल्वेस्टेशन मास्तरशी संपर्क साधला असता, सिग्नल मिळत नसल्याची कुठलीच अडचण नसल्याचे सांगितल्याने चालकाला घातपाताचा संशय अाला. तोपर्यंत चोरटे प्रवासी गाढ झोपेत असल्याची संधी साधून एस ४ बोगीत चढले. त्यानंतर दिसेल त्या प्रवाशांचे मोबाइल, पर्स, दागिने, लॅपटॉप अशा महागड्या वस्तू ओढायला सुरुवात केली. त्यानंतर दरोडेखोर शेजारील बोगीत चढताना दिसले. पुढील दोन बोगींतही त्यांनी लूटमार केली. एका प्रवाशाचे तीन लाख रुपये चोरीस गेल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिस तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...