आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांना मारहाण करीत हाॅटेलवर दराेडा; चाकू दाखवून रक्कम लुटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई‑आग्रा महामार्गावर याच भाऊ हॉटेलवर दरोडा टाकण्यात आला. या वेळी कामगारांना मारहाणही करण्यात आली. - Divya Marathi
मुंबई‑आग्रा महामार्गावर याच भाऊ हॉटेलवर दरोडा टाकण्यात आला. या वेळी कामगारांना मारहाणही करण्यात आली.

कापडणे/धुळे - टाेलनाक्याजवळ नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणापासून जवळच असलेल्या दाेन हाॅटेलवर साेमवारी पहाटे तीन वाजता दराेडेखाेरांनी हैदाेस घातला. यात हाॅटेलवरील तिघा कामगारांना मारहाण करण्यात अाली. चाकूचा धाक दाखवून हाॅटेलच्या गल्ल्यातील मालकाकडे असलेले साडेतीन हजार रुपये लुटले. महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असताना अर्धा किलाेमीटरवर पाेलिस ठाणे असताना दराेडेखाेरांनी थरार निर्माण केला. याप्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा नाेंदवण्यात अाला नव्हता.

 

सोनगीर हद्दीत असलेल्या सरवड गावालगत राष्ट्रीय महामार्गावर टाेल प्लाझाजवळ असलेल्या हॉटेल भाऊ येथे सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकला. तीन ते चार जणांनी येथील हाॅटेल मालक कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत राेकड काढून देण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी हॉटेल मालकावर हल्ला चढवत हॉटेलमधील गल्ल्यातील तीन हजार रुपये काढले. याशिवाय त्यांनी हॉटेल मालकाच्या पॅन्टच्या खिशातून २५० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. या झटापटीत तीन जण जखमी झाले. हॉटेलचे मॅनेजर कन्हय्यालाल शर्मा हे नेहमी प्रमाणे रात्री अकरा वाजता हॉटेल बंद करून झोपले हाेते. त्यांना पहाटे तीन वाजता काहीतरी आवाज ऐकू आला. या वेळी त्यांनी उठून पाहिले असता काेणीतरी काउंटरमधील गल्ला फाेडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. त्यांनी अावाज दिला. तेव्हा त्यांच्या मागून येऊन तिघांनी त्यांना पकडले मारहाण केली. शर्मा यांनी अारडाअाेरड केली.


यावेळी दराेडेखाेरांनी त्यांना तुला जीवे ठार मारू, अशी धमकी देत चाकूचा धाक दाखवला. तसेच हॉटेल भाऊ बाहेर उभ्या असलेल्या ट्रकचालकाला (क्र. एम. एच. २१ एक्स ६४८६) मारहाण केली. त्यानंतर चोरांनी हॉटेल सत्यमवरही चोरीचा प्रयत्न केला. या मारहाणीत हॉटेल भाऊ, हॉटेल सत्यममधील कर्मचारी ट्रकचालक जखमी झाले. याप्रकरणी हेमंत कन्हय्यालाल शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून साेनगीर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात येत हाेता. घटनेची माहिती कळाल्यानंतर साेनगीर पाेलिस दाखल झाले. मात्र, ताेपर्यंत हल्लेखाेर पसार झाले हाेते.

 

दराेड्याचा गुन्हा दाखल : याप्रकरणी हेमंत कन्हय्यालाल शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून साेनगीर पाेलिस ठाण्यात अज्ञात तीन ते चार जणांविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३४, अार्म अॅक्ट ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान, घटनास्थळी साक्रीचे उपविभागीय अधिकारी नीलेश साेनवणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पाेलिस निरीक्षक रमेशसिंग परदेशी, साेनगीर पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच दराेडेखाेरांबद्दल काही पुरावे प्राप्त हाेतात का? याची परिसरात तपासणी केली.  

 

पाेलिसांच्या क्षमतेबद्दल शंका
महामार्गावरदराेडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने पाेलिसांच्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली जात अाहे. महामार्गावर साेनगीर पाेलिसांकडून गस्त घालण्यात येते. तसेच पाेलिसांचे दराेडा प्रतिबंधक पथक रात्रीची जिल्हा गस्तही असते. तरीही महामार्गावर दराेड्याचा प्रयत्न झाल्याने पाेलिसांच्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली जात अाहे. गस्तीवर असलेले पाेलिस नेमके काय करतात असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...