आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजप युतीची मुहूर्तमेढ जळगावातून शक्य! नेत्यांच्या घाेषणेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापनदिनी मंुबईत स्वबळावर लढण्याची घाेषणा केली हाेती. त्यानंतर झालेल्या विधान परिषद व पाेटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार देत भाजपला अाव्हान दिले हाेते. परंतु जळगाव महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेचे सूत पुन्हा जुळत अाहे. त्यामुळे हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवला जाईल का? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून अाहे. 


जळगाव महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ अाॅगस्ट राेजी हाेत अाहे. या निवडणुकीत खाविअा अर्थात शिवसेनेचे नेतृत्व माजी अामदार सुरेश जैन करीत अाहेत. तर भाजपाची कमान खुद्द जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हाती घेतली अाहे. बुलडाणा येथील कार्यक्रमात युतीसंदर्भात दिलेल्या प्रस्तावावर नुकतीच मुंबईत बैठक पार पडली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाेकार दर्शवला अाहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडील बैठकीतही युतीला ना-हरकत देत निर्णयाचे अधिकार स्थानिक नेतृत्वाकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना काय वाटते, यापेक्षा महापालिकेत भाजप व शिवसेनेची युती होईल हे नेत्यांनी मनोमनी निश्चित केले आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...