आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव मनपा निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार : गुलाबराव पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- जळगाव महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. येथे रविवारी पत्रकारांशी वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. जळगाव महापालिकेच्या सर्व ७५ जागा धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिवसेना लढवणार आहे. मागच्या निवडणुकीत आघाडी झाली असली तरी आता स्वतंत्रपणे लढणार आहोत. सुरेश जैन मागील १५ वर्षांपासून शिवसेनेबरोबर आहेत.एकनाथ खडसे यांना ज्यांनी मंत्रिमंडळाबाहेर काढले त्यांनीच त्यांचे पुनर्वसन करावे, असा सल्ला देखील या वेळी बोलताना त्यांनी भाजपला दिला. महामंडळाच्या नियुक्त्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, हा विषय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा आहे. त्यावर आपण बोलणार नाही. 


८ जुलैला मंत्री झालो म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो
मी वर्षभरापूर्वी ८ जुलैलाच मंत्री झालो. आज देखील ८ जुलैच तारीख आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो आहे. मी २५ वर्षांपासून वारीसाठी येथे येतो आहे. दोन वर्षांपूर्वी आपण मंत्री नव्हतो, त्या वेळी ६ जुलै रोजी येथे आलो होतो. मंत्रिमंडळ विस्तार असल्याने त्वरित मुंबईकडे रवाना झालो होतो. त्यावेळी आपण श्री विठ्ठलाला आपल्याकडे लक्ष दे, असे साकडे घातले होते. त्या वेळी त्यांचा आशीर्वाद लाभला, असे गुलाबराव म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...