आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणता राजासाठी सर्व जाती, धर्म, पक्षाची एकजूट; शोभायात्रेत शिवसृष्टीचे मनोहारी दृश्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी शहरात साेमवारी भव्य मिरवणूक काढण्यात अाली. या मिरवणुकीचे वैशिष्टे म्हणजे सर्व जाती, धर्म, पंथ अाणि विविध राजकीय पक्षातील दिग्गज नेते सहभागी झाले हाेते.

 

या सर्व नेत्यांनी मिरवणुकीत चालून, नाचून शिवजन्माेत्सव साजरा केला. त्यामुळे शहरात उत्साहाची लहर दिसून अाली. 'जय भवानी, जय शिवाजीच्या...' जयघाेषात शहर दुमदुमले हाेते. चाैका-चाैकात शिवाजी महाराजांच्या शाैर्यगाथा सांगणारे पाेवाडे ध्वनिक्षेपकावर एेकवले जात हाेते. त्यामुळे अबाल-वृद्धही छत्रपतींच्या प्रेमात पडलेले दिसत हाेते. मिरवणुकीत मनाेहरी दृश्य डाेळ्यांचे पारणे फेडणारे असेच हाेते. उंट, घोडे, बग्गी, लेझीम पथके, नऊवारी नेसलेल्या युवती, मावळे, सजीव आरास हे मिरवणुकीचे वेगळे वैशिष्ट्ये ठरले. हा अनुभव जळगावकरांना सर्वांना सुखावणारा असाच होता.


खडसेंनी धरला ठेका
मिरवणुकीत शिवप्रेमींनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करायला सुरुवात केली. या वेळी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, खासदार ए.टी.पाटील यांनीही ठेका धरला. महापौर ललित कोल्हे, कैलास सोनवणे, महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही माेह अावरला नाही, त्यांनी सर्वांबरोबर ठेका धरला. खडसे यांनी अनेक वर्षांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरल्याने हा अनुभव अनेकांना सुखद धक्का देणारा ठरला.

 

युवकांनी काढल्या सेल्फी
मिरवणुकीत एकनाथ खडसे हे खुल्या जीपमध्ये बसले होते. ती जीप खासदार ए. टी. पाटील यांनी चालवली. या वेळी युवकांनी खडसे यांच्यासोबत सेल्फी काढल्या. तर खडसेंनी मिरवणुकीत युवकांना चॉकलेट वाटप केले. मिरवणूक स्टेडियम चौक, कोर्ट चौक, नेहरू पुतळा, टॉवर चौकमार्गे पुन्हा शिवतीर्थाकडे परतली. तेथे खडसे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

 

शिवजन्माचा देखावा : शहरात काढण्यात अालेल्या रॅलीत खुल्या ट्रकवर युवतींनी शिव जन्माचा देखावा सादर केला होता. तर का.ऊ.कोल्हे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ शिवरायांना युद्ध कलेचे शिक्षण देतानाचा देखावा सादर केला. खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली बाल शिवबाची सजीव आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

 

महाेत्सव समितीने 'दिव्य मराठी'चे मानले अाभार
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप सखाेल सचित्र माहिती 'दिव्य मराठी'ने साेमवारच्या अंकात प्रसिद्ध केल्याबद्दल सर्वत्र काैतुक हाेत अाहे. सार्वजनिक शिवजयंती महाेत्सव समितीच्या सदस्यांनी दुपारी ५ वाजता 'दिव्य मराठी'च्या कार्यालयात निवासी संपादक त्र्यंबक कापडे यांची भेट घेऊन अाभार मानले. 'दिव्य मराठी'मुळे अाजच्या पिढीला शिवरायांच्या लढायांव्यतिरिक्त जनतेप्रती असलेल्या कर्तव्यदक्षतेची माहिती मिळाल्याची भावना या वेळी त्यांनी बाेलून दाखवली. भेटीला अालेल्यांमध्ये महाेत्सव समितीचे सचिव सुरेंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, विनाेद देशमुख, किरण बच्छाव, राम पवार, दीपक सूर्यवंशी, सुरेश पाटील, हिरेश कदम, राजेश पाटील, धनंजय पाटील, समीर जाधव, याेगेश पाटील अादींचा समावेश हाेता.

 

बातम्या आणखी आहेत...