आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार दडपण्याचा प्रयत्न; माजी मंत्री हेमंत देशमुखांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे -  शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या पाचवर्षीय बालिकेवर अज्ञात नराधमाकडून अत्याचार करण्यात आला. घटनेबद्दल दाेंडाईचा पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून पीडित बालिकेच्या कुटुंबाला धमकावण्याच्या आरोपातून माजी कामगार राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह सहा जणांविरुद्ध ठपका ठेवण्यात आला आहे. सध्या पीडित बालिका जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.   


दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरात राहणारी बालिका नेहमीप्रमाणे शाळेत गेली.  अज्ञात नराधमाने मधल्या सुटीच्या काळात तिला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेमागे असलेल्या पडीक घरामध्ये नेले. यानंतर तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार दि. ८ फेब्रुवारीला सकाळी  घडला. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या संस्थेचे पदाधिकारी तथा माजी मंत्री डॉ. हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, महेंद्र आधार पाटील, प्रतीक शरद महाले, नंदू गुलाब सोनवणे यांची भेट घेतली, परंतु संबंधितांनी पोलिसांना कळविण्याऐवजी शाळेची बदनामी करू नका, वैद्यकीय उपचार करून घ्या, सर्व खर्च देऊ, मुलीची काळजी घ्या. याबाबत कोठेही वाच्यता करू नका असे सांगून धमकावले. यानंतर पीडित बालिकेला घेऊन कुटुंबीय जळगावला  निघून गेले. तर अत्याचारामुळे बालिकेची प्रकृती बिघडली. तिला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे बालिकेवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शिवाय याबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर जळगाव शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची कागदपत्रे सायंकाळी दोंडाईचा पोलिस ठाण्यात आली. या कागदपत्रांवरून अज्ञात नराधम व्यक्ती आणि त्यांना मदत करणारे डॉ. देशमुख व इतरांविरुद्ध  गुन्हा  दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...