आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे महापौर ललित कोल्हे यांच्यासह सहा नगरसेवक भाजपत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राजकीय भूकंप झाला. गेल्या दाेन वर्षांपासून खाविअाच्या तंबूत दाखल झालेले महापाैर ललित काेल्हे यांच्यासह सहा नगरसेवकांनी रविवारी सायंकाळी भाजपत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेविका कंचन चेतन सनकत यांनी देखील पक्षांतर केले. युतीसाठी जागा वाटपाच्या वाटाघाटीत भाजपचे पारडे जड झाल्याने जास्तीच्या जागांची अपेक्षा केली जात अाहे. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव शहरात गेल्या दाेन दिवसांपासून जाेरदार घडामाेडी घडत अाहेत. शनिवारी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर भाजपने अापला माेर्चा खान्देश विकास अाघाडीकडे वळवला अाहे. 


मनसेतून माजी आमदार सुरेश जैन यांच्या खान्देश विकास अाघाडीत दाखल झालेले महापाैर ललित काेल्हेंना गळाला लावत भाजपने नगरसेवकांची संख्या वाढविण्यात यश मिळवले. रविवारी दुपारी ४ वाजेपासून सुरू झालेल्या चर्चेच्या फेऱ्या सायंकाळी ७ वाजता अाटाेपल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात रात्री ८ वाजेच्या सुमारास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अामदार चंदुलाल पटेल, अामदार सुरेश भाेळे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काेल्हेंसह सहा नगरसेवकांचा भाजपात प्रवेश साेहळा पार पडला. रविवारी भाजपाने राष्ट्रवादीच्या नगरसेविका कंचन चेतन सनकत यांचाही प्रवेश करून घेतला. महापाैर काेल्हेंनी त्यांच्यासह विजय काेल्हे, सिंधू काेल्हे, संताेष पाटील, खुशबू कमलाकर बनसाेडे, पद्माबाई साेनवणे यांचा भाजपत प्रवेश झाल्याचे सांगितले. 


जनतेचा काैल भाजपलाच
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवून माझ्यासह सहा नगरसेवक व कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला अाहे. जनतेचा काैल भाजपलाच अाहे. त्यामुळे इतरही नगरसेवक भाजपत येऊ शकतात, असे महापौर ललित कोल्हे यांनी सांगितले. 


भाजपशिवाय पर्याय नाही, जास्त जागा हव्यात 
महापाैर काेल्हेंसह सहा नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला अाहे. सर्व पक्षांतून इनकमिंग सुरू झाले अाहे. निवडणूक एकतर्फी हाेईल असे वाटते. शहरातील विकासाचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी युतीसाठी प्रयत्नशील अाहाेत पण जागा वाटपात अामचे पारडे जड झाले अाहे. त्यामुळे अाम्हाला जास्त जागा लागतील. अाता भाजपशिवाय पर्याय नाही. सन्मानपूर्वक जागा वाटप झाल्यास युती मान्य असेल.  
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री. 


कुणाला काही फरक पडणार नाही 
राजकारणात अायाराम -गयाराम सुरूच असतात. अामच्यासाठी ही नवीन गाेष्ट नाही. सर्व जागांवर अामच्याकडे उमेदवार असून उद्या सर्व ७५ उमेदवारांची यादी जाहीर करणार अाहाेत. 
- रमेश जैन, अध्यक्ष, खाविअा 

बातम्या आणखी आहेत...