आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधी सेवा मंदिराचा स्लॅब कोसळला; रिक्षाचालकासह महिलेचे प्राण वाचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सिंधी कॉलनी परिसरातील सिंधी सेवा मंडळाच्या मंदिराचे नवनिर्माण कार्य सध्या सुरू आहे. यात जुनी इमारत पाडत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. यामुळे भिंतीला लागून असलेला विजेचा खांब कोलमडून थेट रस्त्यावर आडवा झाला. यात एक रिक्षाचालकाच्या डोक्यास दुखापत झाली असून रिक्षादेखील चक्काचूर झाली. तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. रवींद्र शालिग्राम वंजारी (वय ४२, रा.रामेश्वर कॉलनी) या रिक्षाचालकासह सुशीला तुलसीदास मोतीरामाणी (वय ५२, रा.सिंधी कॉलनी) असे जखमी झालेल्याची नावे अाहे. 


सिंधी कॉलनीत मुख्य रस्त्यावर सेवा मंडळ आहे. गेल्या काही दिवसांपासून सेवा मंडळातील जुन्या मंदिराचे नवनिर्माण कार्य सुरू आहे. यासाठी जुन्या इमारती जेसीबी मशीनच्या माध्यमातून पाडल्या जात आहेत. खालच्या मजल्यावर तोडफोड झालेली असल्यामुळे हा दुसरा मजलादेखील कमकुवत झाला आहे. यातच सोमवारी काम सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरील एका हॉलचा स्लॅब अचानकपणे कोसळला. हा स्लॅब मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे मोठ-मोठे दगड, विटांचा खच, थेट रस्त्याच्या दिशेने खाली कोसळला. 


नागरिकांची पळापळ 
इमारतीची तोडफोड सुरू असल्यामुळे मुख्य रस्त्यावर विटांचा खच येऊ नये म्हणून लोखंडी पत्रे बसवण्यात आले आहे. दरम्यान, स्लॅब कोसळून या पत्र्यांवर आल्यामुळे मोठा आवाज झाला. भूकंप झाल्याचा भास झाल्यामुळे नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली होती. दरम्यान, काही तरुणांनी हिंमत करून घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्वप्रथम रिक्षाचालक वंजारी व सुशीला मोतीरामाणी यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. यानंतर रस्त्यावर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 


मोठी दुर्घटना टळली 
स्लॅब विजेच्या खांबावर काेसळल्यामुळे दोन्ही बाजूला वीजतारा लोंबकळल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखून लखन वालेचा नावाच्या तरुणाने तत्काळ महावितरणला फोन करुन वीजपुरवठा खंडित करण्याची विनंती केली. त्यानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच महावितरणचे अधिकारी, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लखन याच्या समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी परिसरात नागरिकांची हाेणारी गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा जखमींचे फोटो....

बातम्या आणखी आहेत...