आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरीत कुटुंबीयांना बालमृत्यू राेखण्यासाठी स्मार्ट कार्ड देणार; जिल्ह्यात बालमृत्यू दरात घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राेजगारासाठी ऊस ताेडणीवर जाणाऱ्या मजूरवर्गात बालमृत्यूचे प्रमाण अधिक अाहे. जिल्ह्यात वास्तव्यास असताना या बालकांना अाराेग्याच्या सुविधा अाणि अाहार दिला जाताे. परंतु, दुसऱ्या राज्यात स्तलांतरीत झाल्यानंतर त्यांना अाराेग्याच्या माेफत सुविधा मिळत नाहीत. यापुढे या याेजनांचा त्या बालकांना बाहेरच्या राज्यातदेखील लाभ मिळावा म्हणून हंगामी स्थलांतरीत हाेणाऱ्या   कुटुंबांना यापुढे जिल्हा परिषदेच्या अाराेग्य विभागाकडून स्मार्ट कार्ड दिले जाणार अाहेत. देशातील काेणत्याही राज्यातील अाराेग्य यंत्रणेकडे हे कार्ड ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी दिली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात यंत्रणेला यश येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


जिल्हा परिषदेच्या अाराेग्य विभागाची बैठक सीईअाे शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी जिल्हा अाराेग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते. जिल्ह्यात सन २०१५मध्ये बाल मृत्यूदर ७७९ पर्यंत हाेता, ताे सन २०१८ मध्ये ५५६ पर्यंत खाली अाला अाहे. यात अाणखी घट करण्यासाठी शुक्रवारी सीईअाेंच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात अाली. 


बालमृत्यूमध्ये झालेली घट 
जळगाव जिल्ह्यात सन २०११-१२ मध्ये १५३९ बालमृत्यू झाले हाेते. सन १२-१३ मध्ये १२३६ मृत्यू झाले. सन १३-१४ मध्ये ८८३ तर सन १४-१५ मध्ये ७७९ बालकांचा मृत्यू झाला हाेता. सन २०१६-१७ मध्ये ६०९ वर असलेला बालमृत्यू दर २०१७-१८ या वर्षात ५५६ पर्यंत खाली अाला असल्याचे अहवालात म्हटले अाहे. 


स्थलांतरीत कुटुंबीयांची साेय 
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक अाहे. या तालुक्यातून दरवर्षी शेजारच्या गुजरात अाणि मध्य प्रदेशात माेठ्या प्रमाणावर ऊस ताेडणी मजुरांचे हंगामी स्थलांतरण हाेत असते. अाराेग्य विभागाकडून ५ वर्षापर्यंतच्या मुलांना विविध अाराेग्य सुविधा पुरवल्या जातात व त्यांची नाेंद ठेवली जाते. बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर अशा मुलांकडे दुर्लक्ष हाेत असते. काेणतेही रेकॉर्ड नसल्याने या मुलांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत. यातच बालमृत्यू हाेत असल्याचे संशाेधन बैठकीत पुढे अाले. त्यावर सीईअाे दिवेकर यांनी स्मार्ट कार्ड याेजना सुचवून त्यावर चर्चा केली. जळगाव जिल्हा परिषदेत निधीची तरतूद करून अशा हंगामी स्थलांतरीत बालकांना अारसीएच कार्ड क्रमांक असलेले स्मार्ट कार्ड देण्यात येईल. या कार्डवर असलेला क्रमांक राष्ट्रीय अाराेग्य अभियानाच्या पाेर्टलवर टाकल्यानंतर संबंधित बालकांच्या पूर्ण ट्रिटमेंटची हिस्ट्री दिसेल. त्यानुसार इतर राज्यातदेखील या मुलांना अाराेग्याच्या सुविधा उपलब्ध हाेऊ शकणार अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...