आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जा प्रकल्प; चाळीसगाव प्रकल्पातून रोज 110 मेगावॅट वीज वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- चाळीसगाव ते अाैरंगाबाद रस्त्यावरील कन्नड घाटाच्या पायथ्याशी दरराेज २०० मेगावॅट वीजनिर्मिती करणाऱ्या दाेन साैरऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले अाहे. पहिल्या टप्प्यात दरराेज ११० मेगावॅट वीजनिर्मिती आणि प्रत्यक्ष वितरण सुरू झाले अाहे. १२०० काेटी रुपये खर्चातून तब्बल ११५० एकर क्षेत्रात हे प्रकल्प उभे राहिले. जमिनीपासून ५ फुटांवर साैरऊर्जा निर्माण करणाऱ्या तब्बल साडेसात लाख प्लेट लावल्या अाहेत.   


यासाठी आवश्यक असलेली प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी प्रकल्पाने घेतल्याचे हा प्रकल्प राबवणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाने सांगितले आहे. विनय मित्तल यांच्या अावाडा साेलर ग्रुपमधील फर्मी साेलर फार्म्स (दिल्ली) व जेबीएम साेलर पाॅवर अशी कंपन्यांची नावे अाहेत. या प्रकल्पांमधून अाैरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात वीजपुरवठा करण्यास प्राधान्य दिले जाईल. ‘बांधा, वापरा अन् हस्तांतरण करा’ या तत्त्वाखाली प्रकल्प उभे राहिले अाहेत. साधारणपणे ३५ वर्षांनंतर दाेन्हीही प्रकल्प सरकारकडे हस्तांतरण हाेतील. जेबीएम प्रकल्पाने ५५० तर फर्मी साेलर कंपनीने ५०० एकर जागा साैरऊर्जा प्रकल्पासाठी विकत घेतली.  फर्मी साेलर कंपनीने साडेतीन लाख, तर जेबीएम कंपनीने चार लाख साैरऊर्जा बनवणाऱ्या प्लेट बसवल्या अाहेत. दीड वर्षापूर्वी प्रकल्पांची पायाभरणी करण्यात अाली हाेती. ठाणे येथील गाे रेन्युवल एनर्जी या कंपनीने कन्नड घाटाच्या खालच्या चार गावांमध्ये  ५०० एकर जमीन घेतली आहे. नंतर या कंपनीचे विलीनीकरण फर्मी साेलर फार्म्स या कंपनीत करण्यात अाले.

 

कृषी पंपांना हाेणार फायदा  
साैरऊर्जा प्रकल्पाची वीज सूर्यप्रकाश असेपर्यंतच तयार हाेते. ही वीज काेळसा अन् गॅसच्या विजेप्रमाणे साठवता येत नाही. ती जशी तयार झाली तसे तिचे वितरण करावे लागते. अन्यथा ती वाया जाते. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांपेक्षा जळगावसह शेजारील पाच जिल्ह्यांतील कृषिपंपांना दिवसा साैरऊर्जा प्रकल्पातील तयार विजेचा फायदा हाेईल. साठवून ठेवता येणारी काेळसा अाणि गॅसपासून तयार हाेणारी वीज रात्री वापरता येईल. त्यामुळे अनेक तालुके भारनियमनमुक्त हाेतील. कृषिपंप दिवसा चालावे यासाठीच सरकारने साैरऊर्जा प्रकल्पांना प्राेत्साहन दिले अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी माहिती...

बातम्या आणखी आहेत...