आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा देऊन घरी जाणारा विद्यार्थी अपघातात जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कानळदा येथे बारावीची परीक्षा देऊन घरी देऊळवाडे येथे जात असताना दुचाकी व कारच्या झालेल्या अपघातात दाेन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना कानळदा-नांद्रा दरम्यान शुक्रवारी दुपारी घडली. 


कानळदा येथील आदर्श विद्यालय या परीक्षा केंद्रावर बारावीचा मराठी विषयाचा पेपर संपल्यानंतर घरी जात असलेल्या देऊलवाडे येथील विद्यार्थ्यांच्या दुचाकीचा व कारचा कानळदा-नांद्रा दरम्यान दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात निखील मनोहर सोनवणे या विद्यार्थ्याच्या हाता-पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्या डाेक्यालाही इजा झाली अाहे. तर संदिप ज्ञानेश्वर सोनवणे हा विद्यार्थी जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत बारावीचा मराठी विषयाचा पेपर होता. जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील विद्यार्थ्यांचे कानळदा येथील आदर्श विद्यालय हे परीक्षा केंद्र होते. त्यामुळे निखिल व संदिप हे एम.एच. १९, सी.क्यू. १६२९ या क्रमांकाच्या दुचाकीवर कानळदा येथे परीक्षेसाठी आले होते. परीक्षा झाल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी परत जात असताना निखील दुचाकी चालवत होता. कानळदा-नांद्रा या गावांच्या दरम्यान एम.एच.१९, बी.यू.२०८२ या क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. 

बातम्या आणखी आहेत...