आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोज आठ तास अभ्यास; लिखिताचे पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- २०१४ मध्ये बी. टेक.उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्लीत खासगी क्लास व सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास करुन दीपनगरच्या लिखिता उमरेने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले. एसबीआयमधील प्रोबेशनरी ऑफसर पदाचा राजीनामा देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. तसेच जिद्द आणि जिकाटीच्या जोरावर लिखिताने पहिल्याच प्रयत्नात यश खेचून आणले. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. 


दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील अधीक्षक अभियंता विजय उमरे यांची मुलगी लिखिता उमरेने २०१४ मध्ये बी. टेकची पदवी घेतली. विद्यार्थी दशेतूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचा तिचा मानस होता. याच दृष्टीने बी.टेक नंतर तिने दिल्लीतील खासगी क्लासमधून स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन घेतले. क्लासदरम्यान दिवसातून सलग आठ तास अभ्यास करुन तिने स्पर्धा परिक्षेची तयारी केली. शिक्षणाचा भार स्वत: उचलण्यासाठी तिने २०१५ मध्ये एसबीआयची प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या परिक्षेत यश मिळवले. एसबीआयच्या अकोला शाखेत नोकरी मिळाल्यानंतरही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याची तिची जिद्द कायम होती. यामुळे बँकेची सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंतची नोकरी करुन लिखिताने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. मात्र बँकेच्या दैनंदिन कामानंतर अभ्यास करण्यात अडचणी येऊ लागल्याने तिने बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला. तसेच पूर्णवेळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. २०१७ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशभरातून ८४८ व्या अनुक्रमांकाने उत्तीर्ण होऊन लिखिताने आपल्या स्वप्नांना मूर्तरुप दिले आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या किंवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिखिताने आदर्श निर्माण केला आहे. 


बँकेच्या नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतरदेखील यशावर समाधानी न होता, लिखिताने यूपीएससीतील यशाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले. परिपूर्ण अभ्यास, कठीण वाटणाऱ्या बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन हेच यशाचे सूत्र असल्याचे लिखिताने 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


वडील नोकरदार आई गृहीणी 
लिखिताचे वडील विजय उमरे हे दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत असून, आई स्मिता उमरे गृहिणी आहेत. तिचे शालेय शिक्षण चंद्रपूर येथील कारमेल अकादमीतून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील व्ही.एन.आय.टी.मधून पूर्ण झाले. 


जिद्द, परिश्रम व चिकाटी व अभ्यासातील सातत्यामुळे यश गाठता आले. तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर बँकेची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र मिळालेल्या यशानंतर हा निर्णय योग्य ठरला. स्पर्धा परिक्षेसाठी सातत्य आणि जिद्द कायम ठेवल्यास यश नक्कीच मिळते. 
- लिखिता विजय उमरे 


महानिर्मितीकडून कौतुकाची थाप 
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील अधीक्षक अभियंता उमरे यांच्या कन्येने यूपीएससीत यश मिळवल्याची माहिती दीपनगर येथील केंद्राच्या वसाहतीत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीही आनंद व्यक्त केला. महानिर्मितीच्या परिवारातील मुलीने मिळवलेल्या यशामुळे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनीही लिखिताच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...