आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल: महाआरोग्‍य शिबीरामुळे 17 वर्षांपासून वेदनेने ग्रस्‍त युवकावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया, कुटुंबीयांच्‍या चेह-यावर फुलले हास्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- मागील वर्षी २ ऑक्टोंबर रोजी फैजपूर येथे महाआरोग्य शिबिर पार पडले होते. या शिबीरात प्राथमिक तपासणी नंतर मोठ्या शस्त्रक्रीयेची गरज असलेल्या यावल येथील रूग्णाच्‍या ह्रदयावर मुबंईतील आेकार्ड हॉस्पिटल येथे यशस्वी यशस्वी शस्त्रक्रीया करण्‍यात आली. 27 जूनला ही शस्‍त्रक्रिया पार पडली. मंगळवारी या रूग्णांच्या कुटुंबीयांची आमदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक कुंदन फेगडेसह भाजप पदाधिका-यांनी भेट घेतली. 17 वर्षांपासुन असहाय्य वेदनेने ग्रस्त या तरूणाच्या शस्त्रक्रीयेमुळे त्‍याच्‍या कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

 

फैजपूर येथील महाआरोग्य शिबीरात प्राथमिक तपासणीनंतर मोठ्या शस्त्रक्रीयेची गरज असलेल्या रूग्णांवर मुबंई, औरगाबाद, जळगाव, नाशिक अशा विविध ठिकाणी शस्त्रक्रीया करण्‍यात येतात. मागील दहा महिन्यांपासुन हा उपक्रम सुरू आहे. या शिबीरात यावल शहरातील गुलाम मुस्तुफा खन मजीद खान या १७ वर्षीय मुलांस देखील ह्रदयात छीद्र असल्याने मोठी शस्त्रक्रीया सांगण्यात आली होती. त्यानुसार मोफत शस्त्रक्रीये करीता या मुलावर गेल्या दहा महिन्यात मुंबई येथे विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. नंतर तज्ज्ञ वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक २७ जुन रोजी आेकार्ड हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. तब्बल ५ लाखांचा खर्च असलेल्‍या या शस्त्रक्रीयेकरीता महाआरोग्य शिबीराअंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीसह विविध संस्थांकडून अार्थिक मदत रूग्णास देेण्यात आली. या कामी मंत्री गिरिश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार हरिभाऊ जावळे व यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी अथक परिश्रम घेतले. मुंबई येथे आरोग्य दूत रामेश्वर नाईक, विजय दत्तात्रय काबरा यांनी रूग्णाच्या शस्त्रक्रीयेची पुर्ण जबाबदारी पाहिली. मंगळवारी शस्त्रक्रीया यशस्वी झाल्‍याने खान कुटुंबीय घरी परतले आहे.


भेट घेऊन केली विचारपूस
मंगळवारी आमदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक कुंदन फेगडे, जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, अतुल भालेराव आदींनी रूग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. यामुळे खान कुटुंबीय भारावून गेले. असहाय्य वेदनेतुन या महाआरोग्य शिबीरामुळे मुक्‍तता मिळाली, अशी भावना कुटुंबियांनी व्‍यक्‍त केली आहे. 


उशीर लागतो मात्र, काम होते.
गेल्या सहा महिन्यापुर्वी प्रथम तपासणी करीता गुलाम मुस्तुफा खान यास त्याचे वडील मजीद खान आवश्यक कागदोपत्र घेवुन मुंबईस गेले होते. तेथे आमदार जावळेंच्या माध्यमातुन मंत्री महाजन यांच्‍या मार्गदर्शना खाली रामेश्वर नाईक, विजय दत्तात्रय काबरा यांनी विविध तपासणी करून घेतल्या. अखेर २७ जुनला शस्त्रक्रीया पार पडली. असे मजीद खान यांनी सांगीतले. घाई करू नये, उशीर लागतो, मात्र काम होते, असे ते म्हणाले.


समज, गैरसमज व निराशा
महाआरोग्य शिबीरातील तपासणी नंतर मुबंईला तपासणी होते, शस्त्रक्रीया कुठे होणार हे निश्चित होते, त्यास लागणारा खर्च कसा उपलब्ध करावा या करीता नियोजन होते, शस्त्रक्रीया करणाऱ्या डॉक्टरांची टिमची वेळही महत्वाची असते. याकरीता मुबंईला अनेक वेळा जावे लागते व काही जण या बाबीला निराश होतात.  यामुळे त्‍यांचे गैरसमज होतात व ते  उपचारापासून वंचित राहतात. हे कार्य एका नियोजनबध्द पद्धतीने होते, हे रूग्णांनी लक्षात घेतले पाहिजे,  असे याप्रसंगी आमदार जावळेंनी सांगितले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...