आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात ग्रामसेवकाची ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- धुळे जिल्ह्यातील गोंदूरमध्ये ग्रामसेवक संजय वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोंदूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील स्वच्छतागृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सापडला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठीही सापडल्याची माहिती आहे. परंतु, त्या चिठ्ठीविषयी पोलिसांकडून काहीच वाच्यता केली जात नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला होता. वरिष्ठांकडून वाघ यांना प्रचंड मनस्ताप  होता, असा त्यांचा आरोप आहे. सखोल चौकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...