आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांदाही मुलगी झाली म्हणून छळ; जळगावात विवाहितेची अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दुसऱ्यांदाही मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे ४ वाजता खोटेनगर परिसरातील विठ्ठलवाडीत घडली. तालुका पोलिसांत पती, सासू-सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेच्या पतीस अटक करण्यात आली आहे. 


बबिता क्रांतीलाल पवार (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सोनगीरपाडाचे माहेर व जळगावातील विठ्ठलवाडी येथील सासर असलेल्या बबिता यांना दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने पती क्रांतीलालसह सासू-सासऱ्यांनी तिला मारहाण व शिवीगाळ केली. या त्रासास कंटाळून तिने बुधवारी पहाटे पंख्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. पती क्रांतीलाल एकनाथ पवार, सासरे एकनाथ पवार, सासू विमलाबाई पवार, दीर शांतीलाल पवार या चौघांविरुद्ध विवाहितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. दरम्यान, रात्री ७ वाजता बबितावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. पती क्रांतीलाल याने अग्निडाग दिला. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक रत्नापारखी, जितेंद्र पाटील, वासुदेव मराठे यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...