आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगच्या जागेमधील बांधकामांचे सर्वेक्षण, 40 मनपा अभियंत्यांवर साेपवली जबाबदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मालमत्तांच्या बांधकामाची परवानगी घेताना पार्किंग दाखवली, परंतु प्रत्यक्षात त्या जागेचा वापर अन्य कामांसाठी हाेत अाहे. शहरातील अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणाचे अादेश देण्यात अाले अाहेत. पालिकेच्या ४० अभियंत्यांवर ही जबाबदारी साेपवण्यात अाली असून १० फेब्रुवारीपर्यंत त्यांचा अहवाल मागवला अाहे.

 

शहरात पार्किंगची समस्या देखील डोकेदुखी ठरत अाहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावरील मालमत्तांसमाेर वाहनांच्या माेठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात. इमारतींच्या बांधकामाची परवानगी घेताना नकाशात पार्किंगची साेय दाखवलेली असते. परंतु, प्रत्यक्षात पार्किंगच्या जागेत दुकान व गाेदामासाठी त्याचा वापर केलेला अाहे. त्यामुळे नागरिक थेट रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. यासंदर्भात 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केले हाेते. गुरुवारी सायंकाळी मनपात विभाग प्रमुखांचा अाढावा घेतल्यानंतर प्रभारी अायुक्त तथा जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी शहरातील अशा प्रकारच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे अादेश दिले अाहेत.

 

थेट कारवाईचा इशारा
पार्किंगच्या जागेचा दुसऱ्याच कामासाठी वापर हाेत असल्यास अशा मालमत्ताधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले अाहेत. यासंदर्भातील सर्वेक्षणाची जबाबदारी पालिकेच्या ४० अभियंत्यावर साेपवण्यात अाली असून १० फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे अादेश दिले अाहेत. तसेच जप्त केलेल्या गाळ्यांचे मूल्य निर्धारणाचे काम हाती घेण्याच्या सूचना अायुक्तांनी दिल्या अाहेत.
 

बातम्या आणखी आहेत...