आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडली तलवार, चॉपरसह हद्दपार आरोपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने मंगळवारी रात्रभर शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात एक तलवार, एक चॉपरसह दोन हद्दपार केलेले आरोपी मिळून आले. त्यांच्यावर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. जी. रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप चौधरी, शरद पाटील, विलास शिंदे, ज्ञानेश्वर कोळी, सागर तडवी यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवली. यात समतानगरातील राजेंद्र उर्फ राज्या साळुंखे (वय २६) व जाकीर हुसेन कॉलनीतील संजय उर्फ डॉन पोपटकर (वय २१) हे हद्दपार केलेले दोघे घरीच आढळून आले. तसेच साळुंखेच्या घरातून सुरा तर पोपटकरच्या घरातून एक तलवार जप्त करण्यात आली. तसेच शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत काेळीपेठ परिसरात किशाेर अशाेक साेनवणे (वय, २४) यांच्याकडून चॉपर जप्त करण्यात आला आहे.

 


१२० रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव, समाधान पाटील, अतुल वंजारी, भरत लिंगायत, परीष जाधव, भरत जेठवे आदींच्या पथकाने मेहरूण, तांबापुरा, सुप्रीम कॉलनीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात दिनकर उर्फ पिन्या चव्हाण (वय २३) याच्याकडे तलवार मिळून आली. रेमंण्ड चौफुलीजवळ साजन पवार (वय २४) हा दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना मिळून आला. जाखनीनगरात अनिता गारुंगे ही दारू विकताना आढळून आली. काल्या मिस्तरी, सनी जाधव, इबू खाटीक व पवन सोनवणे या चार हिस्ट्रीशिटरांना तपासण्यात आले. वॉरंटमधील दोन संशयित मिळून आले. तसेच सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली. सहा पोलिस ठाण्यांनी मिळून एकूण १२० रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले तसेच ४ जणांवर अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला.

 

बातम्या आणखी आहेत...