आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली, आठवी, दहावीच्या अभ्यासक्रमात बदल, कृतीशील शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांचा कस लागणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा-  सन 2018-19 शैक्षिणिक वर्षांकिरता इयत्ता पहीली, आठवी ,दहावीच्या अभ्यासक्रमात बदल झालेला असून यात घोकंपट्टीला थारा न देता कृतीशील शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. तसेच इयत्ता दहावीला मिळणारे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण बंद झाले असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाला कस जास्त लागणार आहे.


उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर 15 जूनपासून शाळा सुरु  झाल्या आहेत. यामुळे शाळा शिक्षणाची, विद्यार्थ्यांची तसेच बदललेल्या अभ्यासक्रमाची चर्चा रंगतांना दिसत आहे. इयत्ता पहिली, आठवी, दहावीच्या विद्यार्थ्यांना नविन अभ्यासक्रमाचा सामना करावा लागणार आहे.
 यात घोकंपट्टीला थारा न देता प्रत्येक विषयाच्या पुस्तकातील ज्ञान व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न नवीन अभ्यासक्रमात केलेला आहे. व्यवसायभिमुख, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, आकलन केंद्रित संकल्पनेवरील धडे विद्यार्थ्यांना नविन अभ्यासक्रमात शिकायला मिळणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासह दहावीच्या अभ्यासक्रमातही बदल केलेला आहे. यात परीक्षा पद्धतीतही मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे. गणित व विज्ञान वगळता सर्व विषयांची परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे. त्यामुळे शांळाकडून मिळत असणारे अंतर्गत गुण हे यावर्षापासुन बंद होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात जास्त कस लागेल हे निश्चित. मराठी विषयाबरोबर गणित,विज्ञान,इतिहास,भूगोल या विषयांच्याही प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका नुसार येणार आहे. यापूर्वी फक्त मराठी,हिंदी,आणि इंग्रजी या विषयांनाच कृतीपत्रिका येत होती. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल पहावयास मिळत आहे. केवळ विज्ञानासाठीच प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने इतर विषयांना मिळणारे 20 पैकी अंतर्गत गुण बंद होणार आहेत. सामाजिक शास्त्र या विषयाचीही 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. यात इतिहास व राज्यशास्त्र 60 गुण व भुगोलासाठी 40 गुण अशी विभागणी करण्यात आलेली आहे.


दहावीच्या अभ्यासक्रमात कृतीशील, सर्जनशील,वैचारिक तसेच उपयोजित ज्ञानावर भर देण्यात आला असून आकलन व उपयोजन पद्धतीवर भर देण्यात आला आहे. यामधुन विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती कशी निर्माण होईल हे दिसून येणार आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार बदलत्या काळाचा विचार करुन शैक्षणिक धोरणाचा विचार करुन अभ्याक्रमात बदल केला गेलेला आहे. गेल्या वर्षी सातवी व नववीच्या अभ्यासक्रमात बदल झालेला होता. यावर्षी पहीली,आठवी,दहावी आणी पुढील वर्षी दुसरी,तिसरी,अकरावी या इयत्तांचा अभ्यासक्रमात बदल होणार आहे.
 

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा
बदलत्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारी सर्वच विषयांच्या कृतीपत्रिका ह्या प्रश्नपत्रिकेद्वारे समोर येईल.यामुळे विद्यार्थ्यांना फक्त घोकंपट्टीवर अवलंबून न राहता चौकस राहावे लागेल. यातून विद्यार्थांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन स्वयंअध्ययनावर भर देता येईल. तसेच शिक्षकांनाही ख-या अर्थाने आपली मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.


क्यू आर कोड मुळे विद्यार्थीही स्मार्ट

बदलत्या काळात अभ्यासक्रम हा स्वयंअध्ययनावर तयार झालेला आहे. यामुळे सध्याच्या गतीमान जीवनात आवश्यक असलेला मोबाईल, इंटरनेट याचाही वापर आपण पुस्तकांच्या माध्यमातुन करता येणार आहे. यात नविन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकांवर ठिकठिकाणी क्यु आर कोड देण्यात आलेले आहे. यामुळे मोबाईलवरुन हा कोड स्कॅन केला म्हणजे आपल्याला त्या संबंधीच्या लिंक्स ओपन होउन अभ्यासात याची मदत होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...