आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन कार्डवरील १२ अंकी क्रमांकाच्या अाधारे कोणत्याही दुकानातून घ्या धान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लाभार्थ्यांना त्यांच्या रेशन कार्डवर असलेल्या बारा अंकी क्रमांकाच्या आधारे जिल्ह्यातील कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. तशी मुभा शासनाने लाभार्थ्यांना दिलेली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व अडचणी असल्यास रूट नॉमिनीच्या उपस्थितीत धान्य वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले. 


रेशन मिळत नसल्यामुळे सोमवारी हरिविठ्ठल नगरातील महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. रेशन दुकानदार धान्य वाटप करत नसल्याचा आरोप या महिलांनी केला होता. याबाबत जाधव यांनी सांगितले की, नेमकी अडचण काय आहे? याबाबत माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्याची व्यवस्था करण्यात येईल. जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या रेशन कार्डशी आधार संलग्नीकरणाचे ९९ टक्के काम पूर्ण झालेले आहे. लाभार्थ्यांचे थम्ब इंप्रेशन घेऊन धान्य वाटप करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांचे थम्ब इंप्रेशन होत नाही किंवा जुळत नाही. त्यांच्यातर्फे रूट नाॅमिनी नेमून धान्य वाटप करण्यात येईल. त्याचप्रमाणे आता लाभार्थ्यांना कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कोणत्याही दुकानातून लाभार्थी धान्य घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना केवळ रेशन कार्डवरील बारा अंकी क्रमांक द्यावा लागणार आहे. जळगाव वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शंभर टक्के धान्य वाटप करण्यात आलेले आहे. जळगाव शहरात थोड्या अडचणी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरणामुळे आता केवळ पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळणार आहे. बोगस लाभार्थी या प्रणालीमुळे अपोआप कमी होणार असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. दरमम्यान, हा निर्णय ग्राहकांना दिलासा देणारा अाहे. 

बातम्या आणखी आहेत...