आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपून-छपून काढले महाविद्यालयीन तरूणींचे फोटो, नागरिकांनी टवाळखोरांना दिली अशी शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील फुले मार्केटमध्ये एका शीतपेयाच्या दुकानात बसलेल्या तीन टवाळखोरांनी मोबाइलमध्ये तरुणींचे फोटो काढले. हा प्रकार लक्षात येताच तरुणींसह नागरिकांनी तिघांना चांगलाच चोप दिला. त्यातील एकाने धूम ठोकली तर दोघांना नागरिकांनी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरुवारी दुपारी ४ वाजता हा प्रकार घडला. 


शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तीन तरुणी फुले मार्केटमध्ये आल्या होत्या. याच दरम्यान, सावखेडा येथील तीन टवाळखोर त्यांच्या शेजारी उभे राहून लपून-छपून तरुणींचे फोटो काढत होते. हा प्रकार तरुणींच्या लक्षात येताच त्यांनी टवाळखोरांना हटकले. त्यांचा मोबाइल तपासला असता त्यात तरुणींसह आणखी काही महिला, युवतींचे फोटो आढळून आले. या टवाळखोरांना चोप देत शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनीही त्यांना प्रसाद दिला. मोबाइलमधील फोटो डिलीट केले. तरुणींच्या तक्रारीवरून त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. या टवाळखोरांनी दिवसभरात अनेक महिला, तरुणींचे फोटो काढले आहे. गावातील तरुणाच्या बस्त्यासाठी ते फुले मार्केटमध्ये आले होते. 

बातम्या आणखी आहेत...