आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये तलाठ्याला चार हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले, बोजा कमी करण्यासाठी मागितले पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- शेतीच्या सातबाऱ्यावरून बॅकेचा बोजा कमी करण्या करीता चार हजांराची लाच मागणाऱ्या तलाठ्या रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने ही कारवाई मंगळवारी केली. हेमंत पांडूरंग जोशी (कोरपावली ता. यावल) असे तलाठ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार  मोहराळे ता. यावल येथील शेतकऱ्याने यावल शहरातील आडीबीआय बँकेकडून शेतीवर कर्ज काढले होते व त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर आवश्यक कागदोपत्रे घेऊन ते कोरपावली येथील तलाठी हेमंत पांडूरंग जोशी यांच्याकडे सोमवारी गेले होते. शेतक-याच्या शेतीच्या सातबाऱ्यावरील बोजा कमी करण्याकरीता तलाठी जोेशी यांनी चार हजार रूपयांची मागणी केली होती तेव्हा तक्रारदाराने थेट लाचलुचपत विभागा कडे तक्रार केली व त्या नुसार मंगळवारी दुपारी सापळा रचण्यात आला व साक्षीदारांसमक्ष लाच स्विकारतांना जोशी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे सादरील कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच उपअधिक्षक जी. एम. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...