आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायर फुटल्याने भरधाव टाटा सुमोची झाडाला धडक, शिक्षकाचा मृत्यू तर बालकासह 5 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टायर फुटल्याने टाटा सुमो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेल्या असलेल्या झाडाला धडकली. - Divya Marathi
टायर फुटल्याने टाटा सुमो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेल्या असलेल्या झाडाला धडकली.

यावल- लग्न समारंभातून परतणाऱ्या टाटा सुमोचे टायर फुटल्याने घडलेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास फैजपूर जवळील मधुकर साखर कारखाना ते न्हावी रस्त्या दरम्यान घडला. अपघातात नुर अली कुदरत अली (सर) रा. न्हावी  यांचा मृत्यू झाला आहे. तर एक बालकासह 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

 

यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी व वरणगाव येथे शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले नूर अली कुदरत अली (वय 48) हे रविवारी सावदा येथे आपल्या एका नातलगाकडे लग्न समारंभात गेले होते व तेथुन त्यांच्या मुंबई येथुन आलेल्या नातलगांच्या टाटा सुमो वाहनाव्दारे लग्न अाटोपून दुपारी दिड वाजेला ते न्हावी येथे जात होते. दरम्यान मधुकर साखर कारखान्या पासुन न्हावी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक वाहनाचे टायर फुटले व वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले. त्यात वाहनातील तीन बालकांसह असलेल्या सहा जणांना गंभीर दुखापती झाल्या सर्वांना फैजपूरातील खाजगी रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. नुरअली कुदरत अली यांची प्रकृती अधिकचं खालवली असता त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी मृत्यू झाला. इतर पाच ही जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अपघातात पठान मुशीर खान (वय48) नसरीनबी मुशीर खान वय (42), सैफअली नुर अली (18) तनवीर अली नुर अली (16), शहेबाज खान मुशीर खान (12) जखमी झाले आहेत. कुदरत अली यांच्या भाच्याचा व भाचीचा सोमवारी विवाह होणार होता, त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मृत्युमुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. 

बातम्या आणखी आहेत...