आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळनिमित्त जळगाव शहरातील चर्च सजले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नाताळचा सण जगभरात माेठ्या उत्साहाने साजरा करण्यात येताे. त्यानिमित्त शहरातही विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे. शहरातील चर्चमध्ये प्रभु येशूंचा जन्म साेहळा साजरा करण्यात येणार अाहे. यासाठी शहरातील चर्चची अाकर्षक सजावट करण्यात अाली अाहे.

 

नाताळ उत्सवानिमित्त शहरातील सर्वच चर्चला विद्युत राेषणाई करण्यात अाली असून प्रवेशद्वारावर येथू ख्रिस्त यांच्या प्रतिमेजवळ देखील सजावट करण्यात अाली अाहे. तर चर्चच्या अांतरभागातही येथू ख्रिस्तांच्या प्रतिमेस दिव्यांची, मेणबत्यांची राेषणाई याच्यासह संपूर्ण हाॅलला अाकर्षक फुलांची सजावट करण्यात अाली अाहे. चर्चच्या परिसरात रंगीबेरंगी पताकाही लावण्यात अाल्या अाहेत. दरम्यान, नाताळनिमित्त शहरातील सर्वच चर्चमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसह समाजपयाेगी कार्यक्रम देखील घेण्यात येणार अाहेत. शहरातील अनेक चर्चमध्ये रंगरंगाेटी देखील करण्यात अाली अाहे.

 

अलायन्स चर्च
अलायन्स चर्चमध्ये शहरातील ख्रिस्ती बांधवांसाठी सोमवारी, २५ डिसेंबर राेजी सकाळी ९.३० वाजता नाताळ सण साजरा करण्यात येणार अाहे. तर यंदा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले असून यात येशूचा जन्म त्याच्या कार्यावर आधारीत हा कार्यक्रम हाेणार अाहे. तसेच सकाळी प्रार्थना, जन्म साेहळा हाेणार अाहे.

 

सेंट थाॅमस चर्च
रामानंदनगर परिसरातील सेंट थाॅमस चर्चमध्येही येशूचा जन्मसाेहळा साजरा हाेत अाहे. सकाळी ८.३० वाजता भक्ती हाेणार अाहे. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी भाविकांकरिता चर्च खुले राहील. त्याचप्रमाणे दुपारी वाजता कॅरल हा गीतांचा कार्यक्रम हाेणार असल्याचे फादर नेल्सन परेरा यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...