आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तू बाजूला राहा, मी यांना शूट करणार आहे'; आमदार कुणाल पाटलांच्या अंगरक्षकाला धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- आमदार कुणाल पाटील यांचे अंगरक्षक असलेले पोलिस कर्मचारी किशोर पाटील यांना एसएमएसने धमकी देण्यात आली. तू माझा मित्र नाही, तर भाऊ आहे. बाजूला राहा मी यांना शूट करणार आहे, अशा आशयाचा हा धमकीवजा संदेश आहे. विनोद परदेशी नामक व्यक्तीने तो पाठवला आहे. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 
देवपुरातील नवरंग कॉलनी परिसरात आमदार कुणाल पाटील यांचे निवासस्थान आहे. पोलिस कॉन्स्टेबल किशोर ताराचंद पाटील हे आमदार पाटील यांचे अंगरक्षक आहेत. अामदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी असताना किशोर पाटील यांच्या मोबाइलवर एसएमएस आला. त्यात किशोर पाटील यांना भाऊ असे संबोधले असून, आमचा वापर करून घेतला व ऑर्डर दुसऱ्याला दिली. मी शूट करण्यास तयार आहे. असे नमूद केले आहे. तथापि या सूचक शब्दांव्यतिरिक्त कोणाच्याही नावाचा उल्लेख मात्र त्यात केलेला नाही. तथापि कॉन्स्टेबल पाटील यांच्याकडे असलेली सुरक्षेची जबाबदारी पाहता हा धमकीचा एसएमएस आमदार कुणाल पाटील यांच्यासाठी असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवपूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शब्दांमागचा अर्थ काय?
एसएमएसमध्ये कॉन्स्टेबल पाटील यांना भाऊ, मित्र संबोधले आहे. शिवाय बाजूल राहा असे सांगितले आहे. त्यामुळे ही धमकी सरळ कॉन्स्टेबल पाटील यांना नाही तर याच एसएमएसमध्ये आमचा वापर केला, ऑर्डर दुसऱ्याला दिली. असे म्हटले आहे. परंतु, ऑर्डर कसली आणि कोणाचा वापर झाला हे मात्र नमूद नाही. शिवाय त्यांना शूट करणार या शब्दात सरळ कोणाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे या सुचक शब्दांमागिल अर्थ पोलिसांना शोधावा लागणार आहे

बातम्या आणखी आहेत...