आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामावरून कमी केल्याचा राग; चाकू दाखवून चालकाने लांबवले तीन ट्रक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सिमेंट कंपनीतील ठेकेदाराने त्याच्याकडे कामास असलेल्या तरुणास कामावरून कमी केले. याचा राग आल्यामुळे तरुणाने ठेकेदार व त्याच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत साडेचार लाखांची खंडणी मागितली. तर खंडणी न दिल्यामुळे ठेकेदाराचे ४८ लाख रूपयांचे तीन सिमेंटचे मिक्सर (ट्रक) चाकूचा धाक दाखवून लांबवले हाेते. या प्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही ट्रक नाशिक येथून जप्त केले आहेत. 


रमेश गौरशेट्टे (रा. भगीरथ कॉलनी) हे नशिराबाद येथील सिमेंट फॅक्टरीत ठेकेदार आहेत. त्यांच्याकडे नीलेश सिताराम साळुंखे (वय ४०, रा. इंदिरानगर, नाशिक) हा तरुण कामाला होता. दरम्यान, गौरशेट्टे यांनी नीलेशला कामावरून कमी केले. याचा राग आल्यामुळे नीलेश याने गौरशेट्टे यांच्यासह कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत फोनवरुन साडेचार लाख रुपयांची खंडणी मागितली होती. वारंवार फोन करून तो गाैरशेट्टे यांना धमकी देत होता व पैशांची मागणी करत होता. अखेर त्याने २१ मे रोजी गौरशेट्टे यांच्या मालकीचे सिमेंटचे तीन मिक्सर (क्रमांक : एमएच १५ डीके १८९५, एमएच १५ डीके ३५३१ व एमएच १५ डीके ३५५२) नाशिक येथे अडवले. मिक्सर चालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून साडेनऊ हजार रुपयांची रोकड व ४८ लाख रूपये किमतीचे तिन्ही मिक्सर नीलेश साळुंखे याने लांबवले होते. या प्रकरणी गौरशेट्टे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशावरून शनिवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नीलेश व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध खंडणी व जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. रविवारी पोलिसांनी नाशिक येथून गौरशेट्टे यांचे तिन्ही मिक्सर ताब्यात घेतले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...