आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीपूर्वी अधिकारी नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू; अायुक्त चंद्रकांत डांगे घेणार प्रधान सचिवांची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेत अायुक्त व उपायुक्तांशिवाय एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने एेन निवडणुकीच्या काळात कामाचा ताण वाढण्याची शक्यता अाहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शासनाने महापालिकेत अतिरिक्त अायुक्त व सहायक अायुक्तांची नेमणूक करावी, यासाठी अायुक्त चंद्रकांत डांगे हे प्रधान सचिवांची भेट घेणार अाहेत. 


निवडणुकीचे अत्यंत महत्त्वाचे काम असून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीत काम पूर्ण हाेणे अपेक्षित अाहे. सध्या मनपात अायुक्त चंद्रकांत डांगे हे अायएएस दर्जाचे अधिकारी अाहेत. याशिवाय १ उपायुक्त व १ सहायक अायुक्तपदाचे २ अधिकारी अाहेत. त्यातही उपायुक्त चंद्रकांत खाेसे हे बदलीच्या प्रयत्नात अाहेत. निवडणुकीचे प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी काळजी घ्यावी लागणार अाहे. त्यामुळे मनपात अतिरिक्त अायुक्त, उपायुक्त व सहायक अायुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्याची विनंती प्रधान सचिवांकडे करणार अाहेत. यासंदर्भात अायुक्त डांगे हे प्रधान सचिवांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...