आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेर तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न; नदीपात्रात पथकावर वाळूतस्करांचा हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो - Divya Marathi
सांकेतीक फोटो

टाकळी ढोकेश्वर- पारनेर तालुक्यातील कोहकडी नदीपात्रात अवैध वाळूउपशाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी झाला. याप्रकरणी अण्णापूरचा माजी सरपंच गोविंद कुरंदळे याच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  


नदीपात्रात  अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती समजल्यावर तहसीलदार सागरे यांनी पोकलेन व ट्रॅक्टरचा ताबा घेतला. तेवढ्यात माजी सरपंचासह १५ ते २० जणांचा जमाव  तेथे आला. त्यांनी सागरे व पथकाला दमबाजी केली. ‘आम्ही पाहतो वाहने कशी नेता?’ असे म्हणून जमावापैकी एकाने ३० लिटर डिझेलचे दोन कॅन पोकलेनवर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंगावरही त्याने डिझेल ओतून घेतले.  महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावरही डिझेल उडाले. जमावातील एकाने काडी ओढली, पण तिने पेट घेतला नाही.  ते पाहून तलाठी गायकवाड यांनी पोकलेनमधून सागरे यांना खाली ओढले. नंतर वाळूतस्करांनी महसूलच्या पथकावर दगडफेकही केली. त्यामुळे महसूल पथकाने जीव मुठीत धरून तेथून पळ काढत या घटनेची माहिती प्रांताधिकारी पोलिसांना दिली. 

बातम्या आणखी आहेत...