आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्‍ये 2 दुचाकींची समोरासमोर जबर धडक, 3 जण गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- तालुक्यातील किनगाव–इचखेडा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरा समोर जबर धडक होत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी हा अपघात घडला. तिघांना घटनास्थळावरून थेट जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 


आज (सोमवारी) सकाळी 11 वाजेच्या सुमारास किनगाव येथील युवक शुभम पाटील (20)  हा दुचाकी क्रमांक (MH 19 AL 3283) यावरून इचखेड्याकडे जात होता. तर इम्रान अरमान तडवी (30) व मुकद्दर कलींदर तडवी (दोघेही रा. इचखेडा) हे दुचाकी क्रंमाक (MH 19 AZ 6786) द्वारे किनगाव कडे येत होते. यादरम्‍यान किनगाव–इचखेडा रस्त्यावर या 2 दुचाकींची समोरासमोर जबर टक्कर झाली. अपघात एवढा भीषण होता की, यामध्‍ये दोन्‍ही दुचाकींचा चुराडा झाला. एका दुचाकीचे पुढील टायर थेट रिंग मधून फुटून बाहेर निघाले. तिघेही युवक या अपघातात जबर जखमी झाले आहेत. रस्त्यावरून येजा करणाऱ्यांनी तात्काळ अपघाताची माहिती 108 वर कॉल करून दिली. तसेच तिघांनाही जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो... 

बातम्या आणखी आहेत...