आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या बहिणीस मेसेज केल्याच्या गैरसमजातून दोन भावांना बदडले; दोघे ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मित्राच्या बहिणीस मोबाइलवरून मेसेज केल्याचा गैरसमज करीत एका टोळक्याने भुसावळ येथील दोघांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाइल लांबवला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नेहरू पुतळा परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय शंकर मंगाम (वय १६)   व त्याचा भाऊ सागर मंगाम (दोघे रा. १५ बंगला, भुसावळ) असे मार खाणाऱ्या तरूणांचे नाव आहे.

 

असा झाला गैरसमज 
१ मंगाम बंधूंना मारण्यासाठी आलेल्या टोळक्यातील एका सदस्याच्या बहिणीवर एका तरुणाने मेसेज केले होते. 'दुपारी ४ वाजता काळ्या रंगाचे शर्ट घालून नेहरू पुतळ्याजवळ थांबेल,' असा निरोप या मेसेजमध्ये लिहिला होता. हा मेसेज तरुणीच्या भावाने वाचल्याने ताे प्रचंड चिडला. यानंतर सोबत ८-१० मित्र घेऊन तो नेहरू पुतळ्याजवळ थांबला. काही वेळातच मंगाम बंधू तेथे पोहोचले. योगायोगाने अजय याने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. 


२ बहिणीस मेसेज करणारा हाच तरुण असल्याचा गैरसमज करून टोळक्याने मंगाम बंधूंवर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. यानंतर अजयचा मोबाइल घेऊन तपासण्यास सुरुवात केली; परंतु, अजय याचा मेसेज प्रकरणाशी काहीच संबंध नसल्यामुळे त्याच्या मोबाइलमध्ये काहीच आढळून आले नाही. शहर ठाण्याचे पथक घटनास्थळी आल्याने त्यांनी गर्दी पांगवत टोळक्यातील दोघांना ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...