आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला भररस्त्यात अडवून लुटले अडीच लाख रुपये, सलग दुस-या घटनेने उडाली खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा- चोपडा-धानोरा रोडवर मोटारसायकलवरील तरुणाला भरररस्त्यात अडवून त्याच्याकडील अडीच लाखांची रोकड लंपास करण्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. गुरुवारीही यावल तालुक्यातील चुंचाळे-नायगाव रस्त्यावर भरदुपारी सव्वा लाख रुपये लुटुन नेल्याचा प्रकार घडला होता. सलग दुस-या दिवशी अशी घटना घडल्याने खळबळ माजली आहे. 


याबाबत सविस्तर असे   की गावातील महेंद्र ट्रेडिंग कंपनीचे मालक सुरेश चौधरी यांचा गावात भुसार मालाचा व्यवसाय आहे. तरी महेंद्र दुपारी चोपडा येथे आपली गाडी क्र एम एच 19 बीएल 3250 ने मक्याचे पैसे घेण्यास गेला. तोचोपडा येथुन जितेंद्र शेठ कडून पन्नास हजार, मुन्नाशेठ कडून दोन लाख रुपये असे अडीच लाख रुपये घेऊन येत होता. साडेचार-पाचच्या सुमारास तो धानोराकडे येत असतांना अडावद जवळील बाजार समितीजवळ असलेल्या गतीरोधकाजवळ आला असता दोन तरुणांनी नवी कोरी असलेली स्पेंलडर गाडी आडवी लावत महेंद्र ला दमदाटी केली. गाडीच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग हिसका देत पळवली. सदर गाडीवर नंबर प्लेट नव्हती. दोन्ही तरुण अडावद मध्ये घुसताना महेंद्र याने पाहीले.त्यांचा पाठलाग केला असतांना दोन बस समोर आल्यात. यामुळे महेंद्र बुचकाळ्यात पडला. भांबावलेल्या अवस्थेत महेंद्र घरी येऊन आपबीती सांगीतली. यामुळे घरी आई,वडील,पत्नी यांनी एकच हंबरडा फोडला. अगोदरच गरीब परीस्थितीतुन सुरेश चौधरी यांनी भुसारीचा व्यवसाय थाटला आहे. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्याची प्रक्रिया आहे. 

बातम्या आणखी आहेत...