आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफियांचा नंबर गेम : पाळधीत जप्त वाळू ट्रॅक्टरला रावेरमधील दुचाकीचा क्रमांक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यात महसूल, पाेलिस अाणि अारटीअाे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांनी सामान्य नागरिकांना जगणे कठीण केले अाहे. अवैध वाळू घेऊन जाणारी माफियांची अवजड वाहने महामार्गाने दरराेज नागरिकांचे जीव घेत अाहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर माफियांकडून नंबर गेम केला जात अाहे. पाळधी पाेलिसांनी तब्बल महिन्यापासून जप्त करून ठेवलेल्या एका वाळूच्या ट्रॅक्टरला चक्क रावेर तालुक्यातील एका व्यक्तीच्या नव्या दुचाकीचा क्रमांक टाकल्याची धक्कादायक माहिती पुढे अाली अाहे. 


पाळधी पाेलिसांनी चांदसर परिसरात अवैध वाळू वाहतूक करून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या एका माफियांचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले अाहे. हे ट्रॅक्टर रेकाॅर्डवर असल्याने त्याच्याकडून कायदेशीर दंड वसूल करावा लागणार अाहे. नव्या वाळू धाेरणानुसार दंडाची रक्कम लाखांमध्ये असल्याने माफियांने हे ट्रॅक्टर पाेलिस ठाण्यातच साेडून दिले अाहे. ट्रॅक्टर नेमके कुणाचे? याची माहिती घेण्यासाठी अारटीअाेकडून रेकाॅर्डची मागणी केली तेव्हा वस्तुस्थिती समाेर अाली. 


असा लागला तपास 
ट्रॅकरच्या समाेर एमएच -१९, टी ०५४० हा क्रमांक टाकण्यात अाला अाहे. गुन्हादेखील याच क्रमांकाने नाेंदवण्यात अाला अाहे. प्रत्यक्षात अारटीअाेकडे असलेल्या रेकाॅर्डनुसार हा क्रमांक दुचाकीचा अाहे. राझाेदा (ता.रावेर) येथील रहिवासी किशाेर घनश्याम सराेदे यांनी जून २०१७ मध्ये ही दुचाकी खरेदी केली हाेती. दरम्यान, पाळधी पाेलिसांकडे जमा असलेल्या ट्रॅक्टरच्या क्रमांकावरून मालकाचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला असता ही वस्तुस्थिती समाेर अाली अाहे. 


माफियांचा नंबर गेम 
जिल्ह्यात वाळूमाफियांकडून वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर एकाच प्रकारचे क्रमांक असतात. एकाच नंबरच्या अनेक नंबर प्लेट वापरल्या जातात. अनेक वेळा या नंबर प्लेट पाळधी येथील ट्रॅक्टरप्रमाणे खाेट्या असतात. काेणत्याही वाहनांचे क्रमांक टाकून वाळूची वाहने वापरत असतात. हे प्रकार माहिती असूनदेखील अाटीअाेकडून नियमित तपासणी, कारवाई केली जात नसल्याची स्थिती अाहे. 

बातम्या आणखी आहेत...