आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू; अवघ्या काही दिवसांवर होते एकाचे लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाेपडा- ट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे चहार्डीचे दाेन युवक ठार झाले. चाेपडा-शिरपूर रस्त्यावरील हातेड गावाजवळ साेमवारी ही घटना घडली. या प्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात अाली अाहे. 


चाेपडा तालुक्यातील चहार्डी येथील सागर कैलास शर्मा (वय २३) व दीपक कैलास महाजन (वय २१) हे दाेघे युवक शिरपूर येथील सूतगिरणीत राेज कामासाठी जात हाेते. रात्रीची ड्युटी अाटाेपून ते साेमवारी सकाळी दुचाकीने (एमएच १९ सीए ३१८७) चहार्डीकडे परत येत हाेते. हातेड गावाजवळ चाेपड्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकने (जीजे ०१ बीवाय ५९३४) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यात दाेघांचा जागीच मृत्यू झाला. दाेघे युवक गेल्या सात ते अाठ महिन्यांपासून शिरपूर सुतगिरणीत कामाला हाेते. 


अपघाताची माहिती मिळताच पाेलिस उपनिरीक्षक नाना दाभाडे, काॅन्स्टेबल सुनील जाधव, संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चाेपडा ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ट्रकचालक अमिन कासम मकराना (अहमदाबाद) याला अटक करण्यात अाली. तपास उपनिरीक्षक नाना दाभाडे हे करीत अाहेत. 


सागरचे ठरले हाेते लग्न 
अपघातात ठार झालेला सागर शर्मा याचे २९ जून राेजी लग्न ठरले हाेते. त्याच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला. दीपक महाजन व कैलास शर्मा हे सूतगिरणीवर कामाला जाण्यासाठी दररोज चारचाकीने जायचे. मात्र, रविवारी रात्री ते दुचाकीने गेले हाेते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...