आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACCIDENT: पंढरपूरला जाणार्‍या गाडीला अपघात, बालंबाल बचावले 19 प्रवासी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापडणे - भामपूर (ता.शिरपुर) येथून पंढरपूरकडे जाणार्‍या गाडीचा अाज (दि.19) सकाळी दहा वाजता देवभाने फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात 19 भाविक प्रवासी जखमी झाले. गाडीची चाके निखळल्‍याने गाडी उलटून झालेल्‍या या भीषण अपघातात सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. देवभाने फाट्यालगत झालेल्या या अपघातात भामपुरसह करवंद, अर्थे, कमखेडा येथील भाविक किरकोळ जखमी झाले अाहेत. जुने भामपूर येथून हे भाविक अाषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी निघाले होते.

 

शिरपूर तालुक्यातील जुने भामपुर येथील भाविक लहान ट्रकसारख्‍या एका वाहनाने (क्र.एमएच १८ एम ३१०८) अाज (दि.१३) सकाळी 9 वाजता पंढरपुर जाण्यासाठी निघाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करत भाविक प्रवास करत असतांनाच सकाळी १० वाजता देवभाने फाट्याच्यापूर्वी गाडीचे चाक निखळले. चाक निखळल्याने गाडी रस्त्‍यावरील दुभाजकावर उलटली. यात अर्थे येथील किरण हिलाल भिल (वय ५०), वासुदेव दीपा भिल (४५) तसेच करवंद येथील तुळशीराम धोंडू पाटील (वय ७१) हे जखमी झाले. यांना सोनगीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले असुन काही भाविक प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. 


किरकोळ जखमींमध्ये विखरण येथील मनोज रवींद्र मराठे (वय २२), यमुनाबाई खंडु मराठे (वय ६५), जयश्री रुणीलाल पाटील (वय १७), उषाबाई रुणीलाल पाटील (वय ३८),  जुने भामपूर येथील रवींद्र अर्जुन बोरसे (वय ४३), धुडकू महाराज (६०), दीपक धुडकू कोळी (चालक) (वय २५), मंगलबाई रतन ईशी (६०) रा. कमखेडा, सोपान प्रताप गुजर (४०) रा.कुवे, शालीक अंबु पवार (७०) रा. उंबर्डे, रघुनाथ धोंडू पाटील (६३) रा. करवंद ऋणीलाल सखाराम पाटील (६५) रा. विखरण, भिकन सुका भिल (४०) रा. अर्थे यांचा समावेश अाहे. गंभीर स्वरुपाच्या या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.


अपघातग्रस्त वाहनातील जखमींच्‍या बचाव कार्यात सोनगीर टोल नाका येथील रवींद्र भामरे, प्रवीण चौधरी, भास्कर पाटील व 108 रुग्णवाहिकेचे चालक कैलास देविदास सूर्यवंशी व डॉ. मूसफ शेख यांनी शर्थीचे प्रयत्न केले.


अपघाताकडे पोलिसांची पाठ
सकाळी दहा वाजेला झालेल्या या अपघातात गाडीमधील १९ जण पूर्णपणे दाबले गेले होते. परिणामी बचाव कार्य करत असतांना वाहनांच्या दुतर्फा लागल्या होत्या. संपूर्ण घटनाक्रम तब्‍बलल दोन तास चालले. मात्र अवघ्या चार किलोमीटर वर असलेल्‍या सोनगीर पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी देखील अपघातस्थळी पोहचले नाही. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी व प्रवाशांनी सोनगीर पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे फोटोज...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...