आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची सभा रद्द करा, अन्यथा 18 मे पासून उपोषणाला बसणार, माजी आमदार संतोष चौधरी यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेच्या बैठकीत पोलिस बळाच्या जोरावर विषय मंजूर केले जातात. जनआधारच्या नगरसेवकांना विषय मांडू न देताच सभा गुंडाळली जाते, यासह अन्य प्रमुख बाबींवर शुक्रवारी जनआधारचे नेते तथा माजी आमदार संतोष चौधरी यांनी नगरसेवकांसोबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून चर्चा केली. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी मंजूर केलेल्या सर्व सर्वसाधारण बैठकींतील विषय कलम ३०८ नुसार रद्द करावेत, अन्यथा १८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला. 


पालिका सभेसमोर ठेवलेले विषय विरोधी पक्षातील नगरसेवकांना विश्वासात न घेताच अजेंड्यावर येतात. बैठकीत पोलिसांना बसण्याची बेकायदेशीर परवानगी दिली जाते. पोलिस बळावर दडपशाहीने सर्व विषय मंजूर केले जातात. विरोधी पक्षातील नगरसेवक ज्यावेळी आपले विषय मांडण्यास उभे राहतात त्यावेळी पोलिस कर्मचारी, अधिकारी हे संबंधीत नगरसेवकास अपमानीत करतात. सत्ताधारी नगरसेवक महिला नगरसेवकांचा वापर करुन नगरसेवकांच्या अंगावर धावून जातात. गेल्या बैठकीतही याच पध्दतीने तीन नगरसेवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांतील विषय पोलिस बळाचा वापर करुन मंजूर केले आहेत. याबाबतची सभांचे चित्रिकरण पाहून शहनीशा करावी, असे निवेदन माजी आमदार संतोष चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जनअाधारचे गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, नगरसेविका मिनाक्षी धांडे, संगिता देशमुख, मिनाक्षी धांडे, प्रदीप देशमुख, आशिक खान यांच्यासह पालिकेतील विरोधी जनआधारच्या गटातील नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...