आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ स्थानकावर 7 काेटी लिटर पाणीबचत; मलजल शुध्दीकरण प्रकल्पाने दिला दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्यभरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे भुसावळ रेल्वे विभागाने मात्र, मलजल शुध्दीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून दरमहा ७ कोटी ५० लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर सुरु केला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या बचतीमुळे उन्हाळ्यातही रेल्वेला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या नाहीत. भुसावळ रेल्वेने राबवलेला हा प्रकल्प मध्यरेल्वेच्या सर्व मंडळस्तरांवर राबवण्यात येणार अाहे. 


भविष्यातील पाणीटंचाईची चाहूल लक्षात घेता रेल्वे प्रशासन मलजल शुध्दीकरण प्रकल्प सुरू करून दरमहा ७ काेटी ५० लाख लिटर पाणीबचत करीत अाहे. पिण्यासाठी तापी नदीतून उचल हाेणाऱ्या १ काेटी ४० लाख लिटर पाण्यापैकी १ काेटी १५ लाख लिटर पाण्याची उचल अाता केली जात अाहे. मध्य रेल्वेतील सर्वात माेठा प्रकल्प म्हणून येथील मलजल शुध्दीकरण केंद्राची अाेळख झाली अाहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या भुसावळ जंक्शनवर दरराेज सुमारे ५० लाख लिटर पाणी लागते तर रेल्वे कर्मचारी, अधिकारी निवासस्थाने, रेल्वेची विविध कार्यालये सर्वत्र मिळून रेल्वेला दरराेज १ काेटी ४० लाख लिटर पाण्याची गरज भासते. त्यातच रेल्वेस्थानकाची सफाई करणे, रेल्वे रूळ, प्लॅटफाॅर्म स्वच्छ करण्यासाठीही माेठ्या प्रमाणावर पाणी लागते. दरराेज १ काेटी ४० लाख लिटर पाण्याची उचल कमी करण्यासाठी व पाण्यावर शुध्दतेची प्रक्रीया खर्च वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मलजल शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. २४ तासात ४० लाख लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प रेल्वे प्रशासनाने सुरू केला अाहे. गेल्या चार वर्षापासून रेल्वे प्रशासनालाही टंचाई जाणवते. दरराेज १ काेटी ४० लाख लिटर पाण्याची उचल तापी नदीतील बंधाऱ्यातून हाेत हाेती. रेल्वेस्थानकावरील अस्वच्छ पाणी, नाल्यातील वाहून जाणारे पाणी असे दरराेज २५ लाख लिटर पाण्यावर या प्रकल्पात प्रक्रीया करून हे पाणी पुन्हा वापरले जाते. विभागातील हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नागपूर येथे ५० हजार लिटर क्षमतेचा तर मुंबई येथे ४ लाख लिटर क्षमतेचा मलजल शुध्दीकरण प्रकल्प सुरू अाहे. 


रेल्वे स्थानकासाठी १२ लाख लिटर पाणी 
मलजल शुध्दीकरण केंद्रात रेल्वेस्थानकावरील अस्वच्छ व गाड्या धुतलेले, प्लॅटफाॅर्म धुतलेले तसेच अन्य पाणी मलजल शुध्दीकरण केंद्रात वळवले असून अस्वच्छ पाण्यावर तेथे प्रक्रीया करून दरराेज २५ लाख लिटर पाणी पुन्हा नव्याने वापरण्याजाेगे तयार केले जात अाहे. याच पाण्याद्वारे रेल्वे स्थानक धुणे, रेल्वे रूळामधील अस्वच्छता दूर करण्यासाठी केला जातो. 

बातम्या आणखी आहेत...