आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीदार गावासाठी व्हाट्सअॅप ग्रुपचा पुढाकार, वॉटर कप स्पर्धेत केले उल्लेखनीय श्रमदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- सोशल मीडियाच्या दुनियेत खऱ्या अर्थाने  शहरातील सामाजिक कार्यासाठी विशेष चर्चेत असलेल्या माझं गाव माझं अमळनेर या व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी रविवारी पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप 2018 या स्पर्धेत सहभागी झालेल्या जवखेडे गावात उल्लेखनीय श्रमदान करून तेथील ग्रामस्थांच्या प्रचंड मेहनतीला बळ देण्याचा प्रयत्न केला.

 

जवखेडा गावाने वॉटर कप 2018 या स्पर्धेत सहभाग घेतल्याने या गावात गेल्या आठ एप्रिल पासून लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून  या गावात शेततळे,नाला बंडीग,खोलीकरंण, शोषखड्डे,वृक्ष लागवड आदी कामे ग्रामस्थांच्या दिवसरात्र श्रमदानातूंन केली जात आहेत,याच प्रमाणे तालुक्यातील इतर गावांनी देखील या स्पर्धेत भाग घेतला असून तेथेही जोमाने काम सुरु आहे.परंतु जवखेडा गावात सर्वाधिक मोठे काम होत आहे. माझं गाव माझं अमळनेर या ग्रुप ने ग्रामस्थांच्या या श्रमदानात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. सुरवातीला ग्रुप एडमिंन सुनिल भामरे यांनी संकल्पना मांडली तर ग्रुप सदस्य असलेले तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व सर्व ग्रुप सदस्यांनी देखील प्रोत्साहन दिले, यामुळे श्रमदानासाठी जवखेडा गावाची निवड करून रविवार हा सुट्टीचा दिवस निश्चित करण्यात आला. सकाळी सहा वाजता ग्रुप टीशर्ट वर अनेक सदस्य घरची शिदोरी बांधून विजय मारुती मंदिरावर एकत्रित आले व तेथून आपापल्या दुचाकीवर जवखेडा गावात दाखल झाले,त्याठिकाणी माजी जि प सदस्य संदीप पाटील व ग्रामस्थांकडून कामाची माहिती जाणून घेतल्यानंतर शेतालगत नाला बंडिंग चे स्वतंत्र आव्हान स्वीकारून 70 ते 75 सदस्य हातात तंगारी व पावड्या घेऊन खोदकामाला लागले. खरेतर सुरवातीला हे सदस्य किती काम करतील हि ग्रामस्थानाही शंकाच होती परंतू बघता बघता हसत खेळत चक्क तीन तास ग्रुप सदस्यांनी प्रामाणिकपणे श्रमदान करून नाला बडिंग चे काम अतिशय गुणवत्तेत पूर्णत्वास आणले.हे चित्र पाहून उपस्थित ग्रामस्थानी देखील संपूर्ण ग्रुप चे कौतुक केले. विशेष म्हणजे या ग्रुप मध्ये युवा पासून जेष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व सर्व क्षेत्रातील सदस्यांचा समावेश होता.

            

 

यानंतर ग्रुप सदस्यांनी गावात रॅली काढून पाण्याबाबत घोषणा दिल्या.तसेच अतिशय मेहनतीने व नगण्य खर्चात निर्माण केलेल्या रोपवाटिकेस भेट दिली.तेथून ग्रामस्थांच्या श्रमदानातून निर्माण होत असलेल्या सर्वाधिक मोठ्या शेततळ्यास भेट देऊन तेथेही थोडे श्रमदान करण्यात आले. यावेळी गावात सुरु असलेल्या संपूर्ण कामाची माहिती ग्रामस्थानी देऊन 'माझं गाव माझं अमळनेर' ग्रुप ने दिलेल्या योगदानाबद्दल विशेष कौतुक केले व अजून पुन्हा या गावात श्रमदानासाठी वेळ द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावर ग्रुप सदस्यांनी चांगल्या लोकहितार्थ कामासाठी आम्ही नेहमीच तयार राहू अशी ग्वाही दिली. या पद्धतीने प्रत्येक रविवारी श्रमदानासाठी योगदान देण्याची तयारी या ग्रुप ने दाखवली असून विविध गावातून त्यांना आमंत्रित केले जात आहे. या ग्रुप चा आदर्श इतर व्हाट्सअप ग्रुप ने घेतल्यास नक्कीच अनेक गावांत लोकहभाग वाढून ती गावे जलमय होण्यास मदतच होणार आहे.

           

 

यावेळी श्रमदानासाठी ग्रुपचे सदस्य सुनिल भामरे ,श्रीराम चौधरी ,किरण पाटील,चेतन राजपूत, गणेश चौधरी ,योगेश जैन, अॅड सुरेश सोनवणे ,पराग जैन ,विजेद्रं शिरसाळे ,संतोष पाटील, सुरेद्रं पाटील, किरण गोसावी,डाॅ जिजाबराव पाटील, दिनेश मणियार, आशिष चौधरी,अतुल महाजन, अमोल माळी,किरण पाटील, हेमंत चौधरी, रणजित शिंदे,जितु सुर्यवंशी, उमेश काटे,उमेश धनराळे, जयेश काटे सोमचंद सदांनशिव, हेमंत महाले ,उमेश चौधरी,विशाल शर्मा ,संजय एकतारे, किशोर पाटील, शाम पाटील,भैय्या साळुंखे, डाॅ मिलींद नवसारीकर ,दिनेश माळी, शिवाजी गोसावी, राजेंद्र चौधरी, प्रविण महाजन, डाॅ उदय खैरनार, डाॅ विलास महाजन, शेखर पाटील, भैय्या महाजन ,भास्कर बोरसे, हिम्मत पाटील गुरुजी, सुनिल महाजन, आदेश पारेख, लक्ष्मीकांत सोनार, कृणाल साळी ,किशोर मराठे ,प्रितेश जैन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...