आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या इमारतीतील दारू दुकानाकडे जिल्हाधिकाऱ्यांचादेखील कानाडाेळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकर प्लाझा येथील दारु दुकानासमाेर उभ्या असलेल्या दुचाकी. - Divya Marathi
शंकर प्लाझा येथील दारु दुकानासमाेर उभ्या असलेल्या दुचाकी.

जळगाव- सर्व नियम डावलून गुजराल पेट्राेल पंप चाैकातील स्वामी समर्थ विद्यामंदिराच्या तळमजल्याजवळच दारू दुकानाला परवानगी देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागासह अाता जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दारू दुकानाकडे कानाडाेळा केला अाहे. तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानाची पाहणी करून कारवाई करण्याचे अाश्वासन दिले हाेते; पण त्यांनी अजूनही दुकानाची पाहणी केली नाही. त्यामुळे परिसरातील महिला वर्गात प्रशासनाविराेधात प्रचंड संतापाची लाट पसरली असून मुख्यमंत्री दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक अांदाेलन करण्याच्या तयारीत अाहेत. 


गुजराल पेट्राेल पंप चाैकातील शंकर प्लाझा इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर स्वामी समर्थ विद्यामंदिर ही शाळा तर इमारतीच्या तळमजल्यावर एन.एन.वाइन हे दारूचे दुकान सुरू असल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केले हाेते. जनतेच्या प्रश्नाविषयी प्रकाश टाकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी 'दिव्य मराठी'चे अाभार मानून दारू दुकान बंद करण्यासाठी थेटजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले हाेते. शाळेच्या इमारतीमध्ये दारूचे दुकान असणे चुकीचे असल्याचे सांगत जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी तीन दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष भेट देऊन कारवाई करू, असे अाश्वासन नागरिकांना दिले हाेते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नागरिक जिल्हाधिकाऱ्यांची वाट पाहत अाहेत. परंतु, जिल्हाधिकारी बुधवारी रात्रीपर्यंत अाले नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाप्रमाणे जिल्हाधिकारी यांनीदेखील दारूच्या दुकानाकडे 'कानाडाेळा' केल्याचे बाेलले जात अाहे. तसेच जिल्हाधिकारी अाश्वासन देऊनही न फिरकल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व प्रचंड संताप व्यक्त केला जात अाहे. तसेच मुख्यमंत्री दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर महिला वर्ग व परिसरातील नागरिक अांदाेलनाच्या तयारीला लागले अाहे. 


संकुलाची स्वच्छता 
जिल्हाधिकारी शंकर प्लाझा या संकुलात भेट देणार असल्याने गेल्या दाेन दिवसांपासून इतरवेळी दुर्गंधी पसरलेल्या संकुलात स्वच्छता करण्यात येत अाहे. तसेच परिसरात उघड्यावर दारू विक्री करणारे देखील सावध झाले हाेते; पण एन.एन. वाइन हे दारूचे दुकान मात्र पूर्ववत सुरू झाले अाहे. 


कसा हाेणार बालकल्याण? 
शाळा अाणि मधुशाळा एकाच इमारतीमध्ये असलेली मालमत्ता महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रतिभा कापसे यांचे पती तथा माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे यांच्या मालकीची अाहे. सभापतींकडून महिला अाणि बालकल्याणचे उपक्रम अपेक्षित असताना त्यांच्याच संकुलामध्ये शाळेच्या खाली दारू विक्री हाेत असल्याने मुलांवर वाईट परिणाम हाेत असून महिलांचे या परिसरात जाणे अवघड झाले अाहे. त्यामुळे हेच का महिला व बालकल्याण, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. दरम्यान, या अवघड प्रश्नाविषयी 'दिव्य मराठी'ने सभापती प्रतिभा कापसे यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, दारू दुकानाला अापलादेखील िवराेध असून प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी माझीसुद्धा अाहे. दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी मी देखील नागरिकांच्या साेबत असल्याचे प्रतिभा कापसे म्हणाल्या. 


'ती' अट काढून टाकल्याचा अाराेप 
गाळेधारकांच्या करारामध्ये अाम्ही मांस, दारू विक्री करता येणार नाही, अशी अट टाकली असताना दारू दुकानासाठी ही अट काढून टाकण्यात अाल्याचा अाराेप इतर गाळेधारकांनी केला हाेता. याबाबत संकुलाचे मालक चंद्रकांत कापसे यांनी अट अनवधानाने काढण्यात अाल्याचे सांगितले. तसेच 'त्या' दुकानात केवळ दारूचे गाेडाऊन ठेवणार असल्याचे एन. एन. वाइनचे मालकांनी सांगितले हाेते. प्रत्यक्षात तेथे दारू िवक्री हाेत अाहे. दारूचे दुकान अपेक्षित नव्हते. दरम्यान, गाळेधारकांना त्रास हाेत असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन तेथे सीसीटीव्ही कॅमेरे, वाॅचमन ठेवण्याबाबत निर्णय घेतला अाहे. दारूच्या दुकानाला पाठीशी घालणार नसल्याचे चंद्रकांत कापसे यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.