आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याने जाणाऱ्या महिलेसोबत ग्रामसेवकाने केले असे काही; गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर (जळगाव)- उटखेडा (ता. रावेर) येथे ग्रामसेवकाने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांनी ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

उटखेडा येथील व अडगाव (ता. चोपडा) येथील ग्रामसेवक तबारक मुस्तफा तडवी याने उटखेडा येथे आज दुपारी एकच्या सुमारास विवाहित महिला खिरोदा रोडवरून शोचास जात असताना या महिलेच्या मागे मोटारसायकलने येऊन मागे पुढे जात या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या बाबत विवाहित महिलेने रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामसेवक तबारक तडवी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नेताजी वंजारी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...