आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने मृत बाळाला २४ तास पोटात वागवले; गर्भपातानंतर सोडला सुटकेचा नि:श्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील महिलेने चोवीस तास मृत बाळ पोटात वागवले. जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर गुरुवारी दुपारी ३.३० वाजता त्या महिलेचा गर्भ पडून गेला. त्यानंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला. 


लताबाई गोरख भील (वय २५) यांना प्रसूती वेदना झाल्याने तिला बुधवारी सकाळी ९ वाजता धरणगाव येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासगी डॉक्टरांनी तिला धरणगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी महिलेच्या पोटातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी पडत असून मृत झाले असावे, अशी शंका उपस्थित केली. त्यानंतर आशा वर्कर संगीता पाटील यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने दुपारी ३.३० वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. 


जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेची सोनोग्राफी व रक्ताचे नमुने तपासण्यास सांगितले. पाटील यांनी रात्री ७.३० वाजता त्या महिलेची सोनोग्राफी करून रक्ताची चाचणी केली. सोनोग्राफी अहवाल आल्यानंतर प्रसूती कक्षातील नर्सने त्यांना पोटातील बाळ मृत झाल्याने सांगितले. रक्ताच्या चाचणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. मृत बाळ पोटातून निघण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी औषध दिल्याचे आशा वर्कर पाटील यांनी सांगितले. दुपारी ३.३० वाजता त्या महिलेचा गर्भ पडून गेला. 


प्रकृती धाेक्याबाहेर 
लताबाई भील या महिलेला दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले. अाैषध दिल्यानंतर महिलेचा गर्भ दुपारी ३.३० वाजता पडून गेला. त्यानंतर तिची प्रकृती व्यवस्थित आहे. 

बातम्या आणखी आहेत...