आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुना वाद; महिलेने अंगावर राॅकेल अाेतून पेटवून घेतले, चाैघे ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राहुल सकट या तरुणाच्या खून प्रकरणानंतर राजीव गांधीनगर सोडून गेलेले बावरी व जुन्नी कुटुंबीय वर्षभरानंतर बुधवारी सायंकाळी घरी परतले. त्यानंतर घरातील साहित्य टाकण्याच्या कारणावरून सकट व जुन्नी यांच्यात जुना वाद पुन्हा उफाळून आला. या वादात गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोगलीबाई जुन्नी या महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळू घेण्याचा प्रयत्न केला. यात ती ५४ टक्के भाजली अाहे. या वादात रामानंदनगर पोलिसांनी जुन्नी कुटुंबातील ४ जणांना ताब्यात घेतले. 


राहुल सकट या तरुणाचा वर्षभरापूर्वी खून करण्यात आला होता. राहुलच्या खुनानंतर सकट कुटुंबीय व मातंग समाज आक्रमक झाला होता. खून प्रकरणातील मुख्य आरोपी सत्यासिंग मायासिंग बावरी व इतरांच्या अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी राहुल सकट खून प्रकरणातील मुख्य आरोपी सत्यासिंग याला अटक केली. त्यानंतर संतप्त सकट कुटुंबीय व समाजबांधवांची समजूत काढली. बावरी कुटुंबीयांना इतरत्र हलवण्याची मागणीही करण्यात आली होती. पोलिसांनी बावरी कुटुंबीयांना इतरत्र जाण्यास सांगितले होते. त्यानंतर बावरी व जुन्नी कुटुंबीय राजीव गांधीनगरातून निघून गेले होते. ते बोदवड, मलकापूर येथे राहिले. 

 

वर्षभरानंतर बुधवारी बावरी व जुन्नी कुटुंबीय राजीव गांधीनगरात परतले. मृत राहुलची आई राहत असलेल्या घरासमोर जुन्नी यांनी सोबत आणलेले साहित्य टाकण्याच्या जुन्या वादातून बुधवारी वाद झाला. मृत राहुल याची आई, भाऊ, बहीण, मेव्हणा व जुन्नी कुटुुंबीय यांच्यात हा वाद झाला. या वादातून जीवनसिंग जुन्नी, अज्जु जीवनसिंग जुन्नी, जल्लू जीवनसिंग जुन्नी, सागर जीवनसिंग जुन्नी या चौघांनी शिवीगाळ करून धमकी दिली, अशी फिर्याद अजय प्रल्हाद सकट यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री दिली होती. तसेच सकट याची अाई व बहीण अंगावर राॅकेल टाकलेल्या अवस्थेत रामानंदनगर पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्या हाेत्या. 


जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोर धमकी 
गोगलीबाई जुन्नी या जळीत महिला ५४ टक्के भाजल्याने त्यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.जी. रोहम व कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. तेव्हा जुन्नी यांच्या मुलांनी सकट कुटुंबीयांचा खून करून टाकू, अशी पोलिसांसमोरच धमकी दिली. 

बातम्या आणखी आहेत...