आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डंपरची रिक्षेला धडक, जखमी महिलेचा मृत्यू; अाहुजानगरजवळच्या रस्त्यावर अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पाळधी येथून जळगावात प्रवासी रिक्षा येत हाेती. त्यात एक महिला दाटीवाटीने पाय बाहेर काढून बसली हाेती. पाठीमागच्या डंपरने जबर धडक दिल्याने या महिलेचा पाय मांडीपासून फाटला. रिक्षाचालकाने त्यांना रुग्णालयात साेडून पळ काढला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. दरम्यान, या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अाशा साेमानी (मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह. मु. प्रेमनगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव अाहे. 


आशा शांतीराम सोमानी (वय ५२) या मूळ पाळधी येथील रहिवासी आहेत. त्या सध्या जळगावात राहायच्या. गुरुवारी पाळधीत महेश नवमीनिमित्त कार्यक्रम होता. सोमानी कुटुंबीयांच्या हस्ते पूजा होती. त्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता आशाबाई या पाळधी येथे गेलेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी मुलगा व सुनेला घरी पाठवले. त्या तेथेच थांबल्या. सायंकाळी ६.३० वाजता जळगावला येण्यासाठी त्या रिक्षेत बसल्या. त्यांच्यासोबत बळीरामपेठेतील चार महिला बसल्या. जळगावकडे येताना त्यांचा एक पाय रिक्षाच्या थोडा बाहेर होता. आहुजानगरजवळ पाठीमागून भरधाव डंपर आला. रिक्षाला ओव्हरटेक करताना आशाबाई यांच्या पायाला डंपरने धडक दिली. त्यात त्यांचा उजवा पाय मांडीपासून फाटला. रिक्षातील महिला खाली काेसळल्या. या अपघातानंतर चालक डंपरसह घटनास्थळावरून पसार झाला. 


अवैध प्रवासी वाहतूक 
रिक्षाचालकाने जखमी आशाबाई यांना नागरिकांच्या मदतीने डॉ. प्रताप जाधव यांच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी नीलेश श्रीकृष्ण सोमानी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात डंपरचालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आशाबाई साेमानी यांचा जीव गेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...