आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटलेली महाराष्ट्र एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न; रेल्वेचे चाक मानेवरून गेल्याने शिक्षिका ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- रेल्वेस्थानकावरून सुटलेली महाराष्ट्र एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षिकेचा रेल्वे अंगावर गेल्याने मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव स्थानकात गुरुवारी सकाळी साडेसात वाजता घडली. प्रतिभा पाटील (३२) असे मृत शिक्षिकेचे नाव अाहे. तालुक्यातील टाकळी प्र.दे. शहरातील अश्वमेघ विद्यानिकेतन शाळेतील शिक्षिका असलेल्या प्रतिभा पाटील या जळगाव येथे जाण्यासाठी गुरुवारी सकाळी सात वाजता घरातून निघाल्या. मात्र, त्यांना वाटेत काही काम असल्याने रेल्वे स्थानकावर पोहचण्यास उशीर झाला. 


घाईघाईत रेल्वेस्टेशनवर पोहोचल्यानंतर त्यांना महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी फ्लॅटफार्मवरून निघताना दिसली. त्यामुळे त्यांनी धावत्या रेल्वेत घाईघाईत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाऊस सुरू असल्याने रेल्वेच्या दरवाजाचे हँडल आेले होते. गाडीत चढत असताना त्यांनी हँडल पकडले. मात्र, हात सटकून त्या रेल्वेखाली पडल्या. यात त्यांच्या मानेवरून चाक गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...