आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला विहिरीच्या काठावर ठेऊन महिलेची अात्महत्या;जळगाव जिल्ह्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाराेळा- सात महिन्याच्या बाळाला खाेकला येत असल्याने रुग्णालयात नेले. तेथून परतीच्या मार्गावर असताना पतीला ‘किराणा घेऊन या अाम्ही निघताे पुढे’, असा निराेप दिला. वाटेवर मात्र एका विहिरीच्या काठावर चिमुकल्याला ठेऊन त्याच विहिरीत उडी घेऊन मातेने अात्महत्या केली. ही घटना साेमवारी (दि.५) पाराेळा शहरातील कजगाव रस्त्यावर घडली.  


पाराेळा तालुक्यातील देवगाव येथील समाधान पवार व पुजा पवार हे दांपत्य साेमवारी अापले बाळ कुणालला पाराेळा येथे घेऊन अाले. एका रुग्णालयात बाळाला दाखवून ते दुसऱ्या रुग्णालयात नातलगाला भेटण्यासाठी गेले. काही वेळाने पुजा पवार यांनी पती समाधान पवार यांना ‘किराणा घेऊन या अाम्ही निघताे पुढे’, असे सांगितले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाेधाशाेध केली तरी पुजा यांचा शाेध तपास लागत नव्हता. काही वेळाने शहरातील कजगाव रस्त्यावरील एका विहिरीच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा अावाज परिसरातील नागरिकांना अाला. त्याच ठिकाणी महिलेच्या चपला पडलेल्या हाेत्या. त्यामुळे संशय बळावला. नागरिकांनी विहिरीत डाेकावून पाहिले असता त्यात महिलेने उडी घेऊन अात्महत्या केल्याचे दिसले. पाेलिसांना ही माहिती देण्यात अाली. त्यानंतर पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून पत्नीचा शाेध घेणारे समाधान पवार यांनाही ही माहिती मिळाली, त्यांनीही तिकडे धाव घेतली. पाेलिसांनी जबाब घेऊन विचारपूस केली. पुजाचे माहेर साेयगाव येथील अाहे. माहेराकडील नातेवाईक सायंकाळी सहा वाजता पाराेळ्यात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी अाक्राेश केला. दरम्यान पुंजू मराठे यांच्या माहितीवरून पाराेळा पाेलिस ठाण्यात अकस्मात 
मृत्यूची नाेंद करण्यात अाली. तपास सहायक पाेलिस निरीक्षक अजित देवरे करीत अाहेत.

 

शेतमजुरीवर उदरनिर्वाह
मृत पुजा पवार ही पतीसाेबत शेतमजुरी करायची. या उत्पन्नातून तीन वर्षाची मुलगी, सात महिन्याचा कुणाल यांचे पालनपाेषण करून कुटुंबांचा रहाडगाडा अाेढायची. अार्थिक परिस्थिती बेताची असल्याने याच विवंचनेतून तिने अात्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...