आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YAWAL : शहरातील खाटीक वाड्यात डॉक्टरांवर चाकू हल्ला करून रोकड केली लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी डॉक्टर रिजवान - Divya Marathi
जखमी डॉक्टर रिजवान

यावल - शहरातील खाटीक वाड्यात एका डॉक्टरावर त्यांच्या दवाखान्यात जावुन एकाने चाकुने हल्ला केला रमजान ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या  या घटनेमुळे  शहरात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी पाऊने आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले तर हल्लेखोराने रूग्णांलयातुन तीन हजाराची रोकड लांबली.

 

शहरातील खाटीक वाड्यात अल फैज क्लिनीक हे डॉ. रिजवान अहमद फैज अहमद पठाण यांचा दवाखाना आहे शुक्रवारी सांयकाळी ते दवाखान्यात असतांंना संशयीत आरिफ रशीद खाटीक हा तेथे आला व डॉक्टराला चाकुचा धाक दाखवुन जिवेठार मारण्याची धमकी देत ५ हजाराची मागणी केली मात्र, डॉक्टरांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांने थेट डॉक्टरावर चाकूने हल्ला केला.  तो हल्ला डॉ. रिजवान यांनी उजव्या हातावर घेतला. तेव्हा तीन वेळा त्याने हातावर चाकु मारल्याने डॉक्टर रक्त बंबाळ होत घाबरले तेव्हा खाटीक याने त्यांच्या दवाखान्याच्या गल्ल्यात असलेली तीन हजाराची रोकड लांबवली. तसेच त्यास रोखण्याचा प्रयत्न करणारा कंम्पाऊंडर शेख खालीद शेख आमिर यास देखील खाटीक याने तोंडावर बुक्का मारून तेथुन पसार झाला.

 

तेव्हा तात्काळ डॉ रिजवान यांनी पोलिस ठाणे गाठले तेथुन ग्रामिण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी, हवलदार संजय तायडे, विकास सोनवणे, सुनिल तायडे पथकासह दाखल झाले व शहरातुन तात्काळ संशयीता ताब्यात घेण्यात आले आहे घटनास्थळाची पाहणी करून संशयीत खाटीक विरूध्द जबरी चोरी, हल्ला करुन जखमी करणे तसे महाराष्ट्र वैद्यकिय सेवा व्यक्ती व वैद्यकिय सेवा संस्था मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम २०१९ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे, हवालदार संजय तायडे करीत आहे.

 

एकचं खळबळ

मुस्लिम बहुल भागात हा दवाखाना आहे व रमजान ईदच्या पुर्व संध्येला घडलेल्या या घटने मुळे एकचं धावपळ उडाली होती तर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व शांतता रहावी या करीता या संुपर्ण भागात आरसीबीचे पथक बंदोबस्ता करीता लावण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...